एक्स्प्लोर
निवडणुकांसाठी फार पैसा लागतो, सुशीलकुमार शिंदेंचं वक्तव्य
सुशीलकुमार शिंदे आणि आरपीआय नेते राजाभाऊ सरवदे हे आज एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी राजाभाऊ हे देखील सोलापुरातून खासदारकीसाठी इच्छुक आहेत. मात्र निवडणुका लढविण्यासाठी फार पैसा लागतो असे शिंदे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.

सोलापूर : निवडणूक लढविण्यासाठी फार पैसे लागतात असे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये केले. सुशीलकुमार शिंदे आणि आरपीआय नेते राजाभाऊ सरवदे हे आज एकाच मंचावर पाहायला मिळाले. यावेळी राजाभाऊ हे देखील सोलापुरातून खासदारकीसाठी इच्छुक आहेत. मात्र निवडणुका लढविण्यासाठी फार पैसा लागतो असे शिंदे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. यावर राजाभाऊ सरवदे यांनी हजरजबाबीपणे उत्तर देताना 'आपणच ही सवय लावली' अस वक्तव्य केलं. आपण हे विधान गंमतीने केल्याचं स्पष्टीकरणही शिंदे यांनी कार्यक्रमानंतर दिलं. यावेळी राजाभाऊ आपण ही निवडणूक लढवली तर मला आनंदच होईल. रामदास आठवले हे देखील माझे चांगले मित्र आहेत, असेही शिंदे म्हणाले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने ज्येष्ठ नाटककार आणि 99 व्या नियोजित मराठी संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रेमानंद गज्वी यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते.
यावेळी शिंदे यांनी शरद पवारांच्या उमेदवारीवरुन बोलताना म्हटले की, 'शरद पवार माढामधून दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी येत आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. ते विद्वान आहेत त्यांचं कार्य मोठं आहे त्यामुळे पंतप्रधानपदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा योग्य वेळी होईल. आणखी वाचा























