एक्स्प्लोर
पत्नीवर वाईट नजर, आईला मारहाण, मोठ्या भावाने धाकट्याला संपवलं
पत्नीवर वाईट नजर आणि आईला मारहाण करणाऱ्या धाकट्या भावाची मोठ्या भावाने हत्या केल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे.
![पत्नीवर वाईट नजर, आईला मारहाण, मोठ्या भावाने धाकट्याला संपवलं Elder brother killed younger brother for troubling family latest update पत्नीवर वाईट नजर, आईला मारहाण, मोठ्या भावाने धाकट्याला संपवलं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/19193336/murder.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधिक फोटो
नागपूर : पत्नीवर वाईट नजर आणि आईला मारहाण करणाऱ्या धाकट्या भावाची मोठ्या भावाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील गुन्हेगारीचं सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही.
नागपुरात जागनाथ बुधवारी परिसरात ही घटना घडली. धाकटा भाऊ संजय आमदे नेहमीच दारुच्या नशेत आईला मारहाण करायचा, तसंच आरोपी असलेला मोठा भाऊ राजू आमदेच्या पत्नीवरही वाईट नजर ठेवायचा. यामुळे चिडून राजूने काल मध्यरात्री राहत्या घरातच संजयवर हल्ला चढवला आणि त्याची हत्या केली.
विशेष म्हणजे धाकट्या भावाला संपवल्यानंतर राजू आमदे स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने शरणागती पत्करली. पोलिसांनी राजूला अटक केली आहे.
मृत संजय गेल्या अनेक वर्षांपासून दारुच्या आहारी गेला होता. कोणताही कामधंदा न करता कुटुंबियांना दारुसाठी त्रास द्यायचा. वृद्ध आईला दमदाटी करत मारहाण करायचा. त्यामुळे त्याच्या वर्तणुकीला कंटाळूनच थोरला भाऊ राजू आमदेने त्याची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)