श्रीकांत शिंदेंची उमेदवारी फडणवीसांकडून जाहीर, म्हणजेच शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात; सुषमा अंधारेंची टीका
Sushma Andhare : 'श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी फडणवीसांनी जाहीर करावी, म्हणजेच शिंदे सेनेचा रिमोट आता भाजपच्या हातात आहे', असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे.
Lok Sabha Election : महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti Seat Sharing) तिढा निर्माण करणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Lok Sabha Constituency) श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) करण्यात आली आहे. दरम्यान, यावरूनच आता ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेवर टीका केली जात आहे. 'श्रीकांत शिंदेंची उमेदवारी देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर करण्यात आल्याने, शिंदेसेनेचा रिमोट भाजपच्या हातात असल्याचे स्पष्ट होत असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) शिंदेसेनेवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान यावर बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “श्रीकांत शिंदे हे एकनाथ भाऊंचे चिरंजीव असून, त्यांच्याबद्दल आमच्या मनात आस्था आहे, आपुलकी आहे. त्यांची उमेदवारी त्यांच्या वडिलांनी अर्थात राज्याचे मुख्यमंत्री आणि बाहेर पडलेल्या गटाचे प्रमुख म्हणून ती उमेदवारी एकनाथ भाऊने जाहीर करायला हवी होती. परंतु, श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी फडणवीसांनी जाहीर करावी, याचा अर्थ स्पष्ट होत आहे की, शिंदे सेनेचा रिमोट आता भाजपच्या हातात आहे', असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे.
फडणवीस काय म्हणाले?
कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपकडून विरोध होत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “श्रीकांत शिंदे यांना भाजपचा विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहे. भारतीय जनता पार्टी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीने आणि मागीलपेक्षा जास्त मतांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सर्वजण म्हणजेच भाजप, शिवसेन, राष्ट्रवादी, रसपाश सर्वच मित्रपक्ष मिळून निवडणून आणणार असल्याचे." फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीसांनी उमेदवारी जाहीर करण्याचे कारण रामदास कदमांनी सांगितले...
श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्याने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी फडणवीसांचे आभार मानले आहे. तसेच, याबाबत बोलतांना म्हणाले की, आधीच श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली असती, तर इतर उमेदवारांचा गैरसमज झाला असता. सुरवातीलाच मुख्यमंत्री यांच्या मुलाची घोषणा केली असती, तर मुख्यमंत्री आपल्याच मुलाचं पाहत असल्याचे इतर उमेदवारांना वाटले असते. तसेच आमचं काय असेही त्यांना वाटले असते. त्यामुळे कोणताही मुख्यमंत्री असते तर त्यांनी आधी इतर जागांची घोषणा केल्यावरच आपल्या स्वतःचा विचार केला असता. मी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानतो की, त्यांनी ही उमेदवारी एकनाथ शिंदे यांना जाहीर करायली लावली नाही. तर फडणवीस यांनी स्वतः जाहीर केली. यातूनच आमची युती किती घट्ट आहे हे देखील दाखवून दिली असल्याचे कदम म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :