एक्स्प्लोर

अमित शाहंच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरं रुप बाहेर, 'जय गुजरात'च्या घोषणेवरुन राऊतांचा एकनाथ शिंदेंवर 'प्रहार'

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात 'जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं. यावर खासदार संजय राऊतांनी टीका केलीय.

Sanjay Raut on Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात 'जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळाला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात एकनाथ शिंदे  बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केलाय. अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रुप आज बाहेर आल्याचे राऊत म्हणाले. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल करत राऊतांना शिंदेंवर टीका केली. 

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात ही घोषणा दिल्यानंतर संजय राऊतांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रुप आज बाहेर आले आहे. पुण्यात या महाशयांनी अमित शाह समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली आहे. काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या.  हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? असा सवाल करत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. 

जय गुजरात या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांणा उधाण

पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या भाषणादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी "जय हिंद, जय महाराष्ट्र,जय गुजरात" असा नारा दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आश्चर्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय गुजरात’ ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने यापुढे राजकीय चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोषणेमागे कोणते राजकीय संकेत आहेत का, यावर अद्याप शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय तयार झालेला आहे.

अमित शाह त्यांच्यासमोर एकनाथ शिंदेंनी लाचारी पत्करलीय

आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतो. आता उपमुख्यमंत्री आहोत याचा विसर त्यांना अमित शाह यांच्यामुळं पडला आहे असे संजय राऊत म्हणाले. ते स्वतःला शिवसेनेचे प्रमुख नेते वगैरे मानतात. पण त्यांची शिवसेना नसून शाह सेना आहे. शाहसेनेच्या संहितेत जागून. त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह त्यांच्यासमोर त्यांनी अशा प्रकारची लाचारी पत्करली असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यावर मत काय आहे? असा सवाल राऊतांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सांगितले आहे की, महाराष्ट्रात आम्ही जय महाराष्ट्र म्हणू पण जेव्हा आम्ही पंजाबमध्ये गेल्यावर जे पंजाब बनू किंवा ज्या राज्यात गेलो त्या राज्यात आम्ही ते बोलू. पण हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातल्या पुण्यनगरीमध्ये जय गुजरात चा नारा दिला असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्र गुजरातला विकण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सगळ्यांची सही शिक्के आहेत, आहे स्पष्ट झाल्याचे राऊत म्हणाले.  

त्यांच्या पक्षाची सुरुवातच गुजरातमधून झाली 

आपल्या मालकाच्यासमोर जय गुजरात म्हणणं म्हणजे त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? असेही राऊत म्हणाले.  ते डुप्लिकेट आहेत म्हणून त्यांना आम्ही शाह सेना म्हणतो आणि आपण शाह सेनेचे सरदार आहोत, ते आज त्यांनी पुण्यनगरीमध्ये बोलून दाखवलं. हे बोलून त्यांनी महाराष्ट्राचं भवितव्य आणि भविष्य कोणाच्या हातात आहे हे दाखवून दिल्याचे राऊत म्हणाले. जय गुजरात चा नारा दिला जातो  त्यामुळे केडिया यासारख्या लोकांना बळ मिळत आहे.  इकडे शिंदेंच्या पोटातलं ओठावर आलं. त्यांच्या पक्षाची सुरुवातच गुजरातमधून झाली आहे. शाह सेनेची स्थापना सुरतला झाली त्यामुळे त्यांच्या गर्भात आणि पोटात जे आहे ते समोर आल्याचे राऊत म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde Jai Gujrat : अमित शाहांसमोर पुण्यात एकनाथ शिंदे म्हणाले, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात!

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: 'ज्यांनी कोणी गडबड केली आहे त्याच्यावर कारवाई होईल', अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: 'ज्यांनी कोणी गडबड केली आहे त्याच्यावर कारवाई होईल', अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
Ajit Pawar Plane Crash: दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?
दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?
Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या 'त्या' विधानावरून राज्यभरात टीकेचा उद्रेक, निवास्थानी शिवप्रेमींकडून धमकी, काँग्रेसकडून मात्र प्रदेशाध्यक्षांना भक्कम साथ
हर्षवर्धन सपकाळांच्या 'त्या' विधानावरून राज्यभरात टीकेचा उद्रेक, निवास्थानी शिवप्रेमींकडून धमकी, काँग्रेसकडून मात्र प्रदेशाध्यक्षांना भक्कम साथ
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
Smriti Mandhana ISWOTY Award: क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
Amit Thackeray On Mumbai Accident : मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video: मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
Embed widget