एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, आभार यात्रेत खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (MP Dhairyashil Mane) यांनी केलं आहे.

MP Dhairyashil Mane : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (MP Dhairyashil Mane) यांनी केलं आहे. जनतेचा मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं असल्याचेही धैर्यशील माने म्हणाले. आभार यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापुरात आले होते. कोल्हापूरच्या सरवडे इथं शिवसेनेची आभार यात्रा होती. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत धैर्यशील माने बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्यात 5 आमदार शिवसेनेचे
प्रकाश आबिटकर यांच्या रुपाने आपण या भागाचा सन्मान केला आहे. आबिटकर यांना नामदार तर केलं आणि पालकमंत्री देखील केल्याचे धैर्यशील माने म्हणाले. जनतेचा मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे. एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे माने म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीच्या 10 पैकी 5 आमदार शिवसेनेचे असल्याचे धैर्यशील माने म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यामुळं प्रकाश आबीटकर हे आमदार झाले असल्याचे धैर्यशील माने म्हणाले. साहेब तुम्ही येणार म्हणून गावागावातील लोक उत्सुक होत असे माने म्हणाले. आपण तळागाळीतल जनतेचं नेतृत्व तुम्ही करत आहेत.
सर्वांच्या ताकदीवर भगवी पताका तेवत ठेऊ
सर्वांच्या ताकदीवर भगवी पताका तेवत ठेवण्याचे काम आम्ही करणार असल्याचे धैर्यशील माने म्हणाले. पक्षाची ताकद वाढत आहेत. बाळासाहेबांचे विचार दिल्ली दरबारी, महाराष्ट्रात मांडत असल्याचे धैर्यशील माने म्हणाले. नगसेवक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आहे. तुमच्यासारखा नेता मिळणं हे आम्हा सर्वांचं भाग्य असल्याचे माने म्हणाले. आज बाळूमामांचा आशिर्वाद घेऊन साहेब आले आहेत. बाळूमामांच्या आशिर्वादाने तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही असे माने म्हणाले. बाळूमामा तिर्थक्षेत्र विकास हे खूप मोठं काम आहे. या भागात मोठं मंदिर उभं करावं, यासाठी राज्याच्या तिजोरीचं दार उघडावं असे धैर्यशील माने म्हणाले.
साहेब आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत असे माने म्हणाले. आम्ही तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याला मंत्री मागत होतो. पण तुम्ही आंधळा मागतो एक डोळा तुम्ही दोन डोळे दिले. मंत्रीपद तर दिलेच पण तुम्ही पालकमंत्रीपद देखील दिल्याचे धैर्यशील माने यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
गणेश नाईकांच्या वनखात्याचा एकनाथ शिंदेंच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्का, मुनावळे जल पर्यटन प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश






















