Eknath Shinde Dasara Melava LIVE : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, पण विरोधक कोर्टात गेले; एकनाथ शिंदेंची टीका
Eknath Shinde Dasara Melava LIVE : विधानसभेच्या निवडणुकीआधी यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असून त्याचे प्रत्येक अपडेट्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

Background
Eknath Shinde Dasara Melava LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत होणार असल्याची चर्चा होती. पण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आझाद मैदानात पार पडणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यानिमित्ताने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून शहरातून आझाद मैदानावर दाखल होत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांची खास जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास 40 ते 50 हजार लोक जेवतील अशी तयारी या ठिकाणी सुरू आहे. त्यासाठी मसाले भात आणि कोशिंबीर असा मेन्यू आहे.
आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते रडारवर असणार आहेत.
Eknath Shinde Dasara Melava LIVE : लोकसभेप्रमाणे मतदानावेळी सुट्टीवर जाऊ नका, विधानसभेचा विजय भव्य-दिव्य असला पाहिजे; एकनाथ शिंदेंचे मतदारांना आवाहन
लोकसभेत तिकडे एक गठ्ठा मतदान झाले. पण आपण सुट्टी बघून फिरायला गेलो. हे पुन्हा होईल का? आता मतदार यादी तपासायला हवी. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोचवा. तुम्हाला मान खाली घालयला आम्ही सांगितले नाही, ताठ मानेने जगायला शिकवले आहे. आज दसरा आहे, असत्याचा रावण आपल्याला गाडून टाकायचा आहे. विधानसभेचा विजय भव्य दिव्य असला पाहिजे. निर्धार करा विरोधकांना चारही मुंड्या चीत करण्याचा. राज्यात आज जे वातावरण आहे ते समृद्ध आहे. हे आपण केलं ते येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.
Eknath Shinde Dasara Melava LIVE : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, पण विरोधक कोर्टात गेले; एकनाथ शिंदेंची टीका
या सरकारने आधीच्या दसरा मेळाव्याला शपथ घेतली होती, मराठा समाजाला आरक्षण देणार. आम्ही ताबडतोब आरक्षण दिलं. पण कोर्टात कोण गेले? तरीही कोर्टाने मराठा आरक्षण अजून कायम ठेवले आहे.























