एक्स्प्लोर

कावड यात्रेकडे पाठ फिरवणाऱ्यांचं पालथं झालं, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला, म्हणाले, संतोष बांगर शिवसेनेचा ढाण्या वाघ 

अडीच वर्षात आमदार संतोष बांगरला (Santosh Bangar) 2 हजार 600 कोटी रुपये निधी दिला असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं.

Eknath Shinde :  अडीच वर्षात आमदार संतोष बांगरला (Santosh Bangar) 2 हजार 600 कोटी रुपये निधी दिला असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं. महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्षात तीन कोटी रुपये दिले होते असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्याकडे पेन नव्हते, इकडे दोन दोन पेन असल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केल्याचे ते म्हणाले. ज्यांनी कावड यात्रेकडे पाठ फिरवली त्यांचं पालथ झालं असे म्हणत उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंनी सडकून टीका केली. ते हिंगोलीत बोलत होते. 

जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणार

दुसरी इनिंग आता सुरु झाली आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणुकपूर्वी महाविकास आघाडीने मंत्रिमंडळ तयार केलं होतं, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला. बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले हे विचार बघण्यासाठी हा जागर पाहण्यासाठी हिंमत लागते. 

आमच्या सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं

उठाव केला तेव्हा एका फोनमध्ये संतोष बांगर सोबत आले आणि ऑपरेशन तक्त पलटी करुन टाकलं. एक बार मैने कमिटमेंट कर ली तो मैं खुदकी भी नहीं सुनता असे ही एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही, वीज बिल माफ करतो म्हणून काँग्रेस सत्तेत आले आणि निवडून आल्यावर शेतकऱ्यांना वीज बिल दिलं. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.  आपण सरड्या सारखे रंग बदलणारे नाहीत असेही ते म्हणाले. 

कावड यात्रा म्हणजे मिरवणूक नाही तर सनातन धर्माचं प्रतीक

कावड यात्रा म्हणजे मिरवणूक नाही तर सनातन धर्माचं प्रतीक आहे. महादेवाचा उत्सव कावड यात्रा देशभर गाजत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. संतोष बांगर यांच्या कावड यात्रेची कीर्ती देशभर पसरली आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आहे, या संतानी भक्तीची शिकवण दिली आहे. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान वर असते असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

हिंदू माणूस कधीही दहशतवादी नसतो

अनेकांना ही कावड यात्रा बघून अॅलर्जी झाली असेल, पोटदुखी झाली असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना जनता जागा दाखवेल. हा हिंदुत्वाचा जनसागर आहे शिव शंकराने तिसरा डोळा उघडला आहे. शिवरायांचा भगवा, वारकऱ्यांचा भगवा, रामचंद्राचा भगवा आहे. हा दशहतवादाचा आहे का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. भगव्याची अॅलर्जी असणाऱ्या लोकांनी स्वतःला भारतीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही. कुठल्याही जाती पातीचा असूद्या तो आपला आहे परंतू, पाकिस्तानचे गुणगान गाणारा आपला दुश्मन आहे असे बाळासाहेब म्हणायचे. हिंदू माणूस कधीही दहशतवादी नसतो.  धर्माला तुम्ही बदनाम केलं आहे. शिवभक्त तुम्हाला तुमची जागा दाखवणार असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Shirsat : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार का? माझा कट्ट्यावर मंत्री संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं

 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget