एक्स्प्लोर

दिवाळखोर सरकार! सत्ताधारी आमदाराचीच सरकारवर टीका, मग विरोधकांचे काय हाल, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

सरकारच्या आमदाराला जर निधी मिळत नसेल तर विरोधकांचे काय हाल होत असतील? असा सवाल एकनाथ खडसेंनी केवला आहे. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

Eknath Khadse :  सत्तधारी शिवसेना पक्षाचे आमदार किशोर आप्पा पाटीला यांनीच सरकारवर टीका केली आहे.  मला या सरकारने यावर्षी एक रुपयाची कवडीचीही मदत केली नाही असं ते म्हणालेत. याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या आमदारांची ही परिस्थिती असेल तर विरोधकांचे काय हाल होत असतील? असा सवाल एकनाथ खडसेंनी केवला आहे. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

दिवाळखोर सरकारमधीलच एक आमदार सरकारवर टीका करत आहे

या दिवाळखोर सरकारमधीलच एक आमदार सरकारवर टीका करत असेल तर महायुतीत सर्वकाही अलबेल आहे असं नाही, असे एकनाथ खडसे म्हणाले. संजय राऊत हे आजारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः फोनवर बोललो आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. संजय राऊत यांनी मला सांगितलं की मी ठणठणीत बरा होऊन लवकरच जनतेच्या सेवेत येणार आहे. त्यांची वील पॉवर स्ट्रॉंग आहे, त्यामुळं मी लवकर बरा होऊन येईल असं त्यांनी मला म्हटलं आहे. माझ्या शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना आहे तुमची प्रकृती चांगली होवो असे एकनाथ खडसे म्हणाले. 

काहीतरी काळ बेरं आहे, भाजपवर टीका

राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र येत सत्याचा मोर्चा काढला आहे. राज ठाकरे यांनी मतदार यादीत किती मोठा घोड आहे हे पुराव्यानिशी आपल्या सभेत दाखवलं आहे. भाजपने यासंदर्भात उत्तर देण्याची गरज नाही कारण निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. मात्र भाजप उत्तर देत आहे. त्यामुळं यात काहीतरी काळ बेरं आहे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. 

नेमकं काय म्हणाले किशोर पाटील?

पाचोरा येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवला. भाजपच्या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “महायुतीच्या एक वर्षाच्या काळात आमदारांना एक फुटकी कवडीही मिळाली नाही,” असा टोला लगावत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. “शिवसेनेच्या पाचही आमदारांनी ठरवलं, तर जळगाव जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष बसणार. भाजपचे नेते युतीबद्दल बोलतात पण हे कधी पलटी खातील, याचा भरोसा नाही,” असे देखील किशोर पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Fake News: चंद्रपूरमधील वाघ हल्ल्याचा Video खोटा, AI ने बनवल्याचा दावा, गुन्हा दाखल होणार
ViralVideo: 'साप पकडतानाच हाताला चावला', प्राणीमित्र Sameer Ingale यांचा सर्पदंशाने मृत्यू, थरार कॅमेऱ्यात कैद
Uddhav Attacks Govt: 'इंग्रजांना घालवलं, हे भ्रष्टाचारी सरकार काय आहे?', उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांसमोर सवाल
Konkan Politics : उदय सामंत यांना भेटल्याने हकालपट्टी, भास्कर जाधवांचा निकटवर्तीयाला मोठा धक्का
Shakuntala Shelke : बहुजन विकास आघाडीतून शकुंतला शेळके भाजपमध्ये दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Ajit Pawar: अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
अजित पवारांच्या मुलाला सोडलं तर कुणाला काही फुकटचं नको; शेतकरी हात पाय हलवतात म्हणून तू जेवतोय; उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
कोल्हापूरकरांचा नाद खुळा, उच्चशिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून; वरबापाने सांगितलं कारण काय?
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Embed widget