11 वी प्रवेश प्रक्रिया! प्रत्येक विद्यार्थ्याला पुरेसा वेळ मिळणार, 28 मे पर्यंत पहिल्या फेरीसाठी नोंदणी सुरु
विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी दिनांक 28 मे 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

मुंबई : विद्यार्थी नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची सुविधा पहिल्या फेरीसाठी दिनांक 28 मे 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक वेळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवेशाचे वेबपोर्टल मोबाईल द्वारे हाताळताना अधिक सुलभ व्हावे यासाठी काही वेळासाठी पोर्टलची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे.विद्यार्थी आणि पालकांनी गोंधळून जाऊ नये. साईट सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या अपडेट देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्स अप चॅनेल वर आपल्याला लगेच माहिती देण्यात येईल.
इयत्ता. 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या तर्फे अधिकृत व्हॉट्सअप चॅनेल सुरू करण्यात आले आहे. दिनांक 19 मे, 2025 रोजी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रणालीचा विद्यार्थी व पालक यांच्यासाठी सराव करणेकरीता पोर्टल सुरु करण्यात आले होते. सराव करतेवेळी राज्यातील पालक, विद्यार्थी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी व शिक्षणतज्ञ यांच्या अमूल्य सूचना प्राप्त झाल्या आहेत. सदरील सूचनांचा अंतरभाव ऑनलाईन प्रवेश प्रणालीमध्ये करण्यासाठी संबंधित तांत्रिक बदल करणेबाबत सूचित केले आहे.
विद्यार्थी हित लक्षात घेता व तोंत्रिक बाबीची दुरुस्ती करणे आवश्यक
यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार फेरी क्रमांक 1 चे सविस्तर दिनांक 19 मे 2025 ते 13 जून 2025 दरम्यानचे विद्यार्थी नोंदणी, प्राधान्यक्रम व उच्च माध्यमिक विद्यालयांची अलॉटमेंट इत्यादी बाबतच्या दिनांक जाहीर केल्या होत्या. दिनांक 21 मे 2025 रोजी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेत स्थळाबाबत तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ योग्य प्रकारे विद्यार्थी नोंदणी व प्राध्यान्यक्रम कामकाज पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी यापुढे विद्यार्थी हित लक्षात घेता व तोंत्रिक बाबीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, या बाबी लक्षात घेता इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेचे सुधारीत वेळापत्रक दिनांक 22 मे 2025 दुपारी 3 वाजता फेरी क्रमांक 1 बचतचे सविस्तर वेळापत्रक घोषित करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदवण्यास पुरेसा कालावधी देण्यात येणार
पोर्टलवर अर्ज भरण्याची सुरुवात विलंबाने होत असली तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास व पसंतीक्रम नोंदवण्यास पुरेसा कालावधी देण्यात येईल. प्रवेशाचे पोर्टल परिपूर्ण व उत्कृष्ट स्वरुपात उपलब्ध झालेले असेल. कोणतीही छोट्यात छोटी त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रवेशाचे पोर्टल सुरु होण्याची वेळ ऑनलाईन दर्शवण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाईल संदेशाव्दारे कळवण्यात येईल. त्रुटीसह अर्ज भरण्याचे सुविधा देण्याऐवजी पोर्टल सुलभ व त्रुटीरहित करून सुरु करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरणे सोईचे व सुलभ व्हावे व एकंदर प्रवेशाची कार्यवाही कमीत कमी वेळात पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ व उचित सोयी-सुविधा, मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना पुरविले जाईल तरी कोणीही गोंधळून जाऊ नये असे आवाहन करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
























