एक्स्प्लोर

अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, पहिल्याच दिवशी वेबसाईट डाऊन, माहिती भरली पण सेव्ह होईना, विद्यार्थ्यांना मनस्ताप

11th online Process: संकेतस्थळ वारंवार डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांचे लॉगिन होत नाहीये, भरलेली माहिती सेव्ह होत नाहीये आणि अर्ज प्रक्रियेचा पहिलाच टप्पा रखडला आहे.

Maharashtra: राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया आजपासून (21 मे) सुरू झाली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा होती. विद्यार्थ्यांना आजपासून कॉलेज पसंतीक्रम आणि प्रवेश अर्ज ऑनलाइन भरता येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण मंडळाची वेबसाईट क्रॅश झाली आहे. (11th online Admission) संकेतस्थळ उघडताच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असून अनेकांचं लॉगिन होत नाहीय. तर काही ठिकाणी भरलेली माहिती सेव्ह होत नसल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज प्रक्रियेचा पहिलाच टप्पा रखडल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढलाय. शिक्षण विभागाकडून या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरळीत होईल, असं शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केलं आहे.  

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत संकेतस्थळ डाऊन

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया  पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात  अडचणी येत आहेत.अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय. त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय. मात्र, पहिल्याच दिवशी विद्याथ्यांना ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये. यावर शिक्षण संचालनालायकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे

विद्यार्थ्यांना आजपासून कॉलेज पसंतीक्रम नोंदवून ऑनलाइन अर्ज भरता येणार होता. मात्र संकेतस्थळ वारंवार डाऊन होत असल्याने विद्यार्थ्यांचे लॉगिन होत नाहीये, भरलेली माहिती सेव्ह होत नाहीये आणि अर्ज प्रक्रियेचा पहिलाच टप्पा रखडला आहे. ही समस्या केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नसून, महाविद्यालयांतील नोंदणीसाठी जबाबदार कर्मचाऱ्यांनाही तांत्रिक अडथळ्यांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पालकांसह विद्यार्थी करत आहेत. परिणामी, पहिल्याच दिवशी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

अकरावी प्रवेशासाठी कुठे कराल अर्ज? 

अकरावीच्या प्रवेशासाठी www.mahafyjcadmissions.in हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया 21 मेपासून सुरू होणार आहे.

- 21 ते 28 मे दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदणी करता येईल.
- 30 मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल.
- 30 मे ते 1 जूनदरम्यान हरकती व दुरुस्ती प्रक्रिया असतील .
- 3 जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
- 5 जूनला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप केला जाईल.
- अखेर 6 जूनला विद्यार्थाना वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी अधिकृत पोर्टलवर दिसेल.
-6 ते 12 जूनपर्यंत विद्यार्थी आपल्या निवडलेल्या महाविद्यालयामध्ये अ‍ॅडमिशनची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
- 14 जूनला दुसर्‍या फेरीसाठी जागा जाहीर होतील.

हेही वाचा:

राज्यभरात पावसाचा धुमाकुळ, अरबी समुद्र उसळला, तळकोकणात पावसाचा जोर कायम, पुणे, कोल्हापूरात काय स्थिती?

महत्त्वाच्या बातम्या

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  
पावसाची दांडी, पाण्याअभावी पिकं लागली करपू, बनगरवाडीतील शेतकऱ्यांवर गाव सोडण्याची वेळ, ग्रामविकासमंत्र्यांच्या मतदारसंघात भीषण वास्तव  

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget