एक्स्प्लोर
आयसीएसई विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशबाबत शिक्षण विभागाचा नवा निर्णय
प्रवेशप्रक्रियासाठी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा पार्ट 1 आणि पार्ट 2 भरण्यासाठी ज्यामध्ये हे सरासरी मार्क द्यायचे आहेत त्याची 4 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.

Students admission merit list
मुंबई: आयसीएसई विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर जे सरासरी गुण देण्यात आले त्या सहा विषयांपैकी पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील, असे आदेश शिक्षण उपसंचालकाना देण्यात आले होते. आयसीएई विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशप्रक्रियेसंबंधी शिक्षण विभागाने 19 जून रोजी जे परिपत्रक काढले होते त्यानुसार आयसीएसई मार्कशीटवर असलेल्या सहापैकी पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार होते. आता पुन्हा एकदा बदल करत आणखी एक नवा निर्णय सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांना कळविण्यात आला आहे. आयसीएसई मार्कशीटवर विषयांची विभागणी A,B आणि C ग्रुपमध्ये ( ग्रुप 1, ग्रुप2 आणि ग्रुप 3) अशी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सहा विषय घेतले होते त्यांचे ग्रुप A मधील तीन विषय, ग्रुप B मधील दोन विषय आणि ग्रुप C मधील 1 विषय अशी विभागणी केली होती. यामध्ये मार्कशीटवर असलेले पहिले पाच विषय हे ग्राह्य धरले जाणार होते, मात्र या तीन ग्रुप्स पैकी फक्त ग्रुप A आणि B च्या पाच विषयांचेच गुण आता ग्राह्य धरले जाणार आहेत. C ग्रुप मधील एक विषय स्पेशल सब्जेक्ट आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा हा विषय वेगळा असल्याने या सरासरीमध्ये या विषयाचे गुण धरले जाणार नाहीत. यामध्ये आयसीएसई अभ्यासक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी सात विषय घेतले होते त्या विषयांची विभागणी ग्रुप A मध्ये तीन विषय, ग्रुप B मध्ये तीन विषय आणि ग्रुप C मधील एक विषय अशी केली गेली. सात विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व विषयांची सरासरी ग्राह्य धरली जाणार आहे जी 700 गुणांची सरासरी असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा पार्ट 1 आणि पार्ट 2 भरण्यासाठी ज्यामध्ये हे सरासरी मार्क द्यायचे आहेत त्याची 4 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
आणखी वाचा























