Nawab Malik : ईडीला सरकार स्थापन करायचे असेल तर शिवाजी पार्कात या, यशोमती ठाकूर यांची उपरोधिक टीका
ED questioned Nawab Malik : नवाब मलिक यांची ईडीने चौकशी सुरू केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने ईडी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.
Nawab Malik : ईडीला सरकार बनवायची घाई झाली असेल तर त्यांनी शिवाजी पार्कात यावे, अशी उपरोधिक टीका राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीने चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी ईडीच्या कारवाईवर टीका केली आहे.
यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, 'ईडी'ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडीची एकजूट तुटणार नाही. या उलट ती आणखी मजबूत होतेय असेही त्यांनी म्हटले.
ईडी ला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. MVA ची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होतेय.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) February 23, 2022
ईडी नव्हे भाजपला टोला?
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारकडून राज्य सरकार पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने केला जातो. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापरही त्याच कारणाने होत असल्याचाही आरोप करण्यात येतो. यशोमती ठाकूर यांनी ट्वीट ईडीला उद्देशून केले असले तरी हा टोला भाजपला होता अशी चर्चा सुरू आहे.
नवाब मलिक यांची 20 वर्षांनी का चौकशी केली जातेय? संजय राऊतांचा सवाल
केंद्रीय तपास यंत्रणांची पोलखोल आपण करत राहू, तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, नवाब मलिक यांची 20 वर्षांनी का चौकशी केली जातेय? असा सवालही यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
...म्हणून ईडीची कारवाई, रोहीत पवार यांचा हल्लाबोल
नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं आहे, भाजपचे काही पदाधिकारी उघडकीस आणले आहेत. इथं उघड झालेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असं वाटलं असेल, त्यामुळे कारवाई झाली असेल असे रोहित पवार म्हणाले. गुजरातमध्ये देखील 22 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग सापडले असेे पवार म्हमाले. आज संध्याकाळी मलिकसाहेब बाहेर आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल असेही यावेळी रोहित पवारांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Nawab Malik : मलिकांची चौकशी, राष्ट्रवादी आक्रमक; पण नेमकं प्रकरण आहे तरी काय?
- NCP Protest : मलिकांच्या ED चौकशीचा राष्ट्रवादीकडून निषेध, ED कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचे आंदोलन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha