जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांची ईडीकडून बारा तास चौकशी
ईडीतर्फे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एकेकाळी जवळ असलेल्या इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना 200 कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणात काल अटक करण्यात आली. हारून युसूफ आणि रंजित सिंग बिंद्रा अशी अटक आरोपींची नावं आहेत.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून तब्बल बारा तास चौकशी झाली. मात्र या चौकशीचा तपशील अद्याप समोर आलेला नाहीए. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असलेल्या इक्बाल मिर्चीबरोबर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप पटेलांवर होता. याप्रकरणी ईडीने प्रफुल पटेलांना नोटीस बजावली होती.
चौकशीसाठी सकाळी साडे दहा वाजता पटेल ईडी कार्यालयात पोहोचले होते. मात्र बारा तासांवर पटेलांची चौकशीची वेळ गेल्याने राष्ट्रवादी नेते आणि कार्यक्रर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.
वरळीच्या सीजे हाऊस इमारतीच्या जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं नाव ईडीच्या रडारवर होतं. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचं नाव या जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याप्रकरणात जोडलं गेलं.
ED Inquiry | प्रफुल पटेल यांची आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडीकडून चौकशी | मुंबई | ABP Majha
प्रफुल पटेलांनी संबंधित करार करताना कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं होतं, 15 ऑक्टोबर रोजी प्रफुल यांना ईडीकडून नोटीस आली होती. सीडे हाऊसची ही प्रॉपर्टी हजरा इकबाल मेमन यांची असल्याकारणाने याच्या व्यवहाराचा आमच्याशी संबंध नसल्याचं पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं.
ईडीतर्फे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एकेकाळी जवळ असलेल्या इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना 200 कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणात काल अटक करण्यात आली. हारून युसूफ आणि रंजित सिंग बिंद्रा अशी अटक आरोपींची नावं आहेत.
काय आहे प्रकरण ?
मिलेनियम डेव्हलपर्स वरळी येथे सी जे व्यावसायिक इमारत 2006-2007 मध्ये बांधली होती. 2007 मध्ये या इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला मिर्ची परिवाराला मिलेनियम डेव्हलपर्सकडून देण्यात आला होता. हा व्यवहार संशयास्पद असल्यामुळे ED या प्रकाराची चौकशी करत आहे.
इकबाल मिर्चीशी निगडित बेनामी संपत्तीची यादी
सीजे हाऊस – वरळी, मुंबई
सहा एकर जागेवर बंगला - खंडाळा
साहिल बंगला – वरळी, मुंबई
समंदर महल (ए) विंग – वरळी, मुंबई
न्यू रोशन टॉकीज - भायखळा, मुंबई
तीन दुकान - क्रॉफर्ड मार्केट, मुंबई
मिनाज हॉटेल - तारा रोड जुहू, मुंबई
आलिशान बंगला – पाचगणी, नाशिक
संबंधित बातम्या
कथित व्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ईडी कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस, 18 तारखेला चौकशीमहत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
