एक्स्प्लोर
निवडणूक आयोगाची महाराष्ट्र भाजपसह सात राजकीय पक्षांना नोटीस
मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने भाजपसह एकूण आठ राजकीय पक्षांना इनकम टॅक्स रिटर्न्स न भरल्याने, तसेच सतत सांगूनही ऑडिटिंगची माहिती न दिल्याने नोटीस पाठवली आहे.
राज्यातील सत्ताधारी भाजपसह निवडणूक आयोगाने जनता दल (धर्मनिरपेक्ष), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, लोक जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय जनता दल, जनता दल (संयुक्त), ऑल इंडिया यूनाईटेड डेमोक्रेटिक फ्रंट आणि इंडियन यूनियन मुस्लीम लीग यांनी नोटीस पाठवली आहे.
निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी यासंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी, ''या सर्वांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 9 सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून मुदतीच्या आत त्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांची नोंद रद्द करण्यात येईल,'' असे स्पष्ट नमुद केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement