एक्स्प्लोर

31 December In History : ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, राजीव गांधी बनले देशाचे सातवे पंतप्रधान, 'कोविड 19' वर शिक्कामोर्तब; आज इतिहासात 

Today in History : ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आजच्याच दिवशी करण्यात आली होती. 2019 मध्ये कोविड 19 विषाणूवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. 

मुंबई : 31 डिसेंबर रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवशी अनेक महत्वाच्या घडामोडी घडून गेलेल्या आहेत. भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company) आजच्याच दिवशी झाली होती. राजीव गांधींनी  ( Rajiv Gandhi took his oath as prime minister )आजच्याच दिवशी भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. 2019 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (World Health Organization) पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्ये "व्हायरल न्यूमोनिया" प्रकरणांची माहिती मिळाली. हा रोग नंतर COVID-19 असल्याचे निश्चित केले गेले. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1600 : ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company)

ईस्ट इंडिया कंपनी ही एक खाजगी व्यापारी कंपनी होती, जिने 1600 मध्ये इंग्लंडच्या राजेशाही सनदेद्वारे व्यापाराचा अधिकार प्राप्त केला होता. 1600 च्या शतकाच्या शेवटच्या दिवशी राणी एलिझाबेथ I च्या घोषणेद्वारे याची स्थापना करण्यात आली. ही लंडनच्या व्यापार्‍यांची कंपनी होती, जिला पूर्वेकडील व्यापाराची मक्तेदारी देण्यात आली होती. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट पैसे कमविणे हेच होते. 1608 मध्ये कंपनीचे पहिले व्यापारी जहाज भारतात सुरतला पोहोचले, कंपनीला मसाल्याचा व्यापारी म्हणून आपला व्यवसाय सुरू करायचा होता. सन 1708  मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी 'न्यू कंपनी' 'ईस्ट इंडिया कंपनी'मध्ये विलीन झाली. पुढे या कंपनीनं आपलं जाळं इतकं मजबूत केलं की इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्य केलं. 

1857 : ओटावा शहराला कॅनडाची राजधानी घोषित केलं (Ottawa made capital of Canada)

कॅनडाची राजधानी ओटावा आहे. संपूर्ण देशाचा कारभार याच ठिकाणाहून चालतो. हे शहर ओटावा नदीच्या काठावर वसलेले आहे. आजच्याच दिवशी या शहराला राजधानी घोषित केलं होतं. 1857 मध्ये या दिवशी राणी व्हिक्टोरियाने कॅनडाची राजधानी म्हणून ओटावा नाव दिले.

1910  - मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म (Mallikarjun Mansoor)

हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. ग्वाल्हेर घराण्याचे पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, नीलकंठबुवा अलुरमठ आणि  जयपूर घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचे पुत्र मंजी खाँ व भुर्जी खाँ असे तीन गुरू त्यांना लाभले. पद्‌मविभूषण व कालिदास सन्मान आदी मानसन्मान त्यांना मिळाले. त्यांचा मृत्यू 12 सप्टेंबर 1992 रोजी झाला.

1926  - इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा मृत्यू

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा मृत्यू आजच्या दिवशी झालेला. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगडमधील वरसईमध्ये 24 जून 1863 साली झाला होता.  त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे 22 खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी भाषांतर नावाचे मासिक सुरू केले. 1898 साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली. 

1984 - राजीव गांधी भारताचे सातवे पंतप्रधान बनले  ( Rajiv Gandhi took his oath, he was the youngest prime minister )

राजीव गांधींनी आजच्याच दिवशी भारताचे सातवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. वयाच्या 40 व्या वर्षी ते भारताचे पंतप्रधान झाले होते. ते सर्वात तरुण पंतप्रधान होते.   त्यांच्या मातोश्री   इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा त्या 48 वर्षांच्या होत्या तर त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळी ते 58 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.31 ऑक्टोबर 1984 रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दु:खद परिस्थितीत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे पंतप्रधान बनले होते. परंतु वैयक्तिक पातळीवर इतके दु:खी असूनही संतुलन, मर्यादा आणि संयमाने त्यांनी राष्ट्रीय जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली.

1986 : राजनारायण यांचा मृत्यू  (Raj Narayan )

राज नारायण  हे एक भारतीय राजकारणी होते. राजनारायण यांनी रायबरेली येथून इंदिरा गांधींचा पराभव केला होता. त्यांना 'लोकबंधू' असं देखील म्हटलं जायचं

1997 : स्वरराज छोटा गंधर्व यांचं निधन

सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील भाडळे या गावी 10 मार्च 1918 रोजी  झाला होता. सौदागरांना गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी मिळाली होती.  ते मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते-संगीत रचनाकार म्हणून नावारुपाला आले. मराठी नाट्यसंगीतामधील त्यांची कारकीर्द 50  वर्षांहून अधिक प्रदीर्घ होती. 

1999 : बोरिस येल्त्सिन यांचा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा (Russian President Boris Yeltsin resigned)

बोरिस येल्त्सिन यांनी 1999 साली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी राजीनामा दिला आणि पंतप्रधान व्लादिमीर पुतिन कार्यवाहक अध्यक्ष झाले. पुढच्याच वर्षी पुतिन यांची या पदावर निवड झाली. अजूनही रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन ठाण मांडून आहेत. 

2018  कादर खान यांचं निधन (Kader Khan Death anniversary)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते, संवाद लेखक कादर खान यांचा आजच्या दिवशी कॅनडामध्ये मृत्यू झाला होता. त्यांच्या जन्म बलुचिस्तानमध्ये 18 डिसेंबर 1937 रोजी झाला होता.  हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि अभिनय क्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमावलं.

2019 - कोरोनाचा विषाणू 'कोविड 19' वर शिक्कामोर्तब(“viral pneumonia” cases in Wuhan, China;  disease was later determined to be COVID-19)
2019 साली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (World Health Organization) पहिल्यांदा चीनच्या वुहानमध्ये "व्हायरल न्यूमोनिया" प्रकरणांची माहिती मिळाली. हा रोग नंतर COVID-19 असल्याचे निश्चित केले गेले. यापुढं काय घडलं ते आपण पाहिलंच. जगभरात या व्हायरसनं धुमाकूळ घातला. लाखो लोकांचे बळी या कोरोनानं घेतले. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनामुळं लॉकडाऊन करावा लागला. अजूनही हा विषाणू पूर्णपणे संपलेला नाही.  जे पुढील वर्षी जागतिक महामारी बनले.  

इतर महत्त्वाच्या घडामोडी

1929 : महात्मा गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह लाहोरमध्ये पूर्ण स्वराजसाठी आंदोलन सुरु केलं 
1951 : खासदार अरविंद सावंत यांचा जन्म
1984 : मोहम्मद अझरुद्दीनचं कसोटी पदार्पण 
1999 : पनामा कालव्यावर पनामा देशाचे पूर्ण नियंत्रण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget