एक्स्प्लोर

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा! राष्ट्रपतींनीही देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Vijayadashami 2022 : बुधवारी देशभरात विजयादशमी अर्थात दसरा सण उत्साहात साजरा होणार आहे. 

Dussehra 2022: साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणार्‍या दसऱ्याच्या दिवशी (विजयादशमी) आपट्याच्या पानांच्या रूपात 'सोनं' एकमेकांना देऊन हा सण साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी भगवान राम यांनी लंकापती रावणाचा वध करुन विजय मिळवला होता. तसेच या दिवशी रावणाचा पुतळा तयार करुन त्याचे दहन केले जाते. या व्यतिरिक्त नवरात्रौत्सवाचा अखेरचा दसऱ्याचा दिवस असल्याने देवीचे विसर्जन दसरा झाल्यानंतर केले जाते. रावणाचा पुतळा दहन करताना प्रत्येकजण वाइट गोष्टींचा अंत करुन उत्तम मार्गावर जाण्याचा संकल्प करतात. बुधवारी देशभरात दसरा सण साजरा होणार आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपती यांनी देशातील जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

विजयादशमी- दसरा सणानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
 विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा क्षण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयादशमीच्या पुर्वसंध्येला राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विजयादशमीचा हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समृद्धी घेऊन येवो, त्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, विजयादशमी म्हणजे वाईटावर विजय मिळविल्याचा आनंदोत्सव. कोविडच्या बिकट संकटावर मात केल्यानंतर खऱ्य़ा अर्थानं आपल्या सर्वांसाठी हा आरोग्याचा विजयोत्सवच आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आता आपल्याला पुढे जायचे आहे. बलशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रातील प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालावी, अशी आकांक्षा आहे. या विकास पर्वातूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असा विश्वास आहे. या ध्यासपूर्तीसाठी आपण एकजुट करूया या आवाहनासह पुन्हा एकदा सर्वांना विजयादशमी – दसरा सणाच्या मनापासून शुभेच्छा.!

विजया दशमीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा

विजयादशमीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयादशमीच्या पावनपर्वात समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि चांगल्या प्रवृत्तीचे सृजन व्हावे, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, विजयादशमी हा आपल्या संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण आहे. लोकभावनेला अभिव्यक्त करण्यात आपल्या सणांचे खूप मोठे योगदान आहे. विजयादशमी हा सण समाजातील चांगुलपणाचा, मांगल्याचा तसेच दुष्ट प्रवृत्ती आणि अवगुणावर विजय आहे. या पावनपर्वानिमित्त समाजात चैतन्याला उधाण येते. राज्यातील जनतेला सुख-समृद्धी लाभावी तसेच यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभावी.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा
दसरा म्हणजेच विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभसंदेशात त्या म्हणतात:--

“विजयादशमीच्या या मंगल प्रसंगी, मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देते.

संपूर्ण देशभर विजयादशमीचा उत्सव सुष्ट शक्तीने दुष्ट शक्तींवर, सत्याने असत्यावर, अनैतिकतेने नैतिकतेवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण ‘दशहरा ‘म्हणून साजरा करतात आणि श्रीरामाने रावणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून रावण दहन केले जाते. आदर्श आणि योग्य मर्यादाशील वर्तणूकीचा जो आदर्श प्रभू रामांनी आपल्याला घालून दिला आहे,तो पिढ्यानपिढ्या अनेक लोकांना प्रेरणा देत आला आहे. तर, पूर्व भारतात, आज दसऱ्याच्या मिरवणुकीनंतर दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. हा सन म्हणजे भारताच्या सांस्कृतिक एकतेचे आदर्श उदाहरण आहे. “आजही ह्या उत्सवापासून आपल्याला शाश्वत मूल्ये आणि नैतिकता, सत्य तसेच चांगुलपणाची प्रेरणा मिळावी, तसेच आपण सगळ्यांना शांततामय आणि सौहार्दपूर्ण आयुष्य जागता यावे, अशी मी प्रार्थना करते”.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींच्या देशवासियांना शुभेच्छा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे -

''संपूर्ण भारतात पारंपरिक पद्धतीने उत्साहात आणि आनंदात साजरा होणाऱ्या दसऱ्याच्या शुभ प्रसंगी मी सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि शुभकामना व्यक्त करतो. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा हा सण, 'धर्म' किंवा धार्मिकतेवरील आपली श्रद्धा आणखी दृढ करतो. प्रभू श्रीरामाच्या अंगी असणाऱ्या सत्य, न्याय, करुणा, कर्तव्य आणि धैर्य अशा सद्गुणांचे स्मरण करण्याचा आणि त्यापासून प्रेरणा घेण्याचा हा सण आहे. हा सण देशात शांतता, समृद्धी आणि सौहार्द घेऊन येवो, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget