एक्स्प्लोर

दुष्काळयात्रा : नावापुरतंच पाणी असलेली जलाची वाडी

प्रचंड पाऊस पडणारा रायगड जिल्हा....त्याच रायगडातलं नावापुरतंच पाणी उरलेलं जलाची वाडी गाव. लाज आणणारं. रायगडमध्ये महामूर पाणी. पण तेथेच हे पाण्यासाठी तडफडणारं. विकासाच्या लखलखाटातील अंधाराची बेटंच ही. कधी या अंधाराच्या बेटांचं भाग्य उजळणार...

रायगड : दुष्काळ म्हटलं, पाणी टंचाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते मराठवाडा आणि विदर्भच. पण आपल्याच महाराष्ट्रात जेथे पाण्याची मुबलकता मानली जाते त्या कोकण पट्ट्यातही हिवाळ्यानंतरच पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येणारी अनेक गावं आहेत. एकीकडे बारमाही वाहणाऱ्या नद्या तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी वणवण. महाराष्ट्रातल्या पाणीसमस्येचा वेध घेणारी एबीपी माझाची शोधयात्रा...पाण्यासाठी.
सुरुवातीलाच रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांना ग्रासणाऱ्या पाणीटंचाईचा वेध.... रायगडमध्ये तब्बल तीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. बारा महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. उन्हाळ्यातही तुडुंब भरलेल्या. पंचतारांकित रिसॉर्ट. हॉटेलची रेलचेल. वॉटरपार्कही. कोकणातील रायगड जिल्ह्याचं हे तसं लोकप्रिय चित्र. पाण्याची कसलीच ददात नाही असं वाटणाऱ्या याच रायगडात, दुसरं चित्र...काहीसं अनेकांना माहित नसलेलंच...मात्र धक्कादायक. घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात टाकून दऱ्या-खोऱ्यांमध्ये पायपीट करणारे डोंगरावरील गावकरी. सदोष बांधकामामुळे आहे ते जलस्त्रोतही बुजवून बांधल्यानं कोरडी पडलेली धरणं...शेतीबरोबरच सारंच गमावलेले सामान्य...तुडुंब भरलेलं धरण असतानाही पाण्यापासून वंचित ठेवलेला खारपट्टा...हे असं का...याचाच शोध घेण्यासाठी एबीपी माझाची दुष्काळ यात्रा.
एकीकडे साडेतीनशे वर्षांपूर्वीच महाराजांनी जलनियोजनाचं महत्व बजावून सांगितलेलं असतानाही...दुसरीकडे याच किल्ले रायगडापासून काही अंतरावर आहे...जलाची वाडी नावाचं गाव. या डोंगरांच्या रांगात दरीशेजारी वसलेल्या या गावातील पाणीटंचाईचा वेध घेण्यासाठी एबीपी माझाची टीम पोहोचली... गावातील बरीच घरे चांगली बांधलेली...आम्ही पोहचलो तेव्हा गावात लग्नाची लगबग सुरु होती. पण तरीही अनेक गावकरी निघाले होते ते पाणी भरण्यासाठी. आम्हीही निघालो....आणि सुरु झाला एक भयावह प्रवास...उतरती वाट...पायाखाली दगड धोंडे...एका बाजूला काटेरी झाडे. दुसऱ्या बाजूला खोल दरी... अशा वातावरणात चालताना पायाखाली वाळलेल्या पानांचा तुटण्याचा होणारा आवाज मनाला उगाचच काहीसा भीतीदायक वाटणारा.
दोन किलोमीटर पायपीट. उतरती पायवाट तुडवत दरीच्या तळाला पोहोचलो तर तिथं जे दिसलं ते पाहून बारामाही नद्या वाहणारा रायगड जिल्हा तो हाच, यावरचा विश्वासच उडाला.
गावातून खाली दरीत उतरताना गावकरी म्हणाले होते, खूप चालावं लागेल. पाय घसरतो. पण काय करणार नदी तिथंच आहे. सर्व त्रास सहन करत जेव्हा गावकऱ्यांसोबत खाली उतरलो तेव्हा समोर होती ती नदी नव्हतीच. ओहोळही नव्हता. तलावही नव्हता. होतं एक डबकं. थोडं बरं तर बरचसं गढूळ पाणी असलेलं. केवळ पावसाळ्यात तेथून नदीसारखा प्रवाह वाहतो म्हणून गावकरी नदी म्हणतात.
दुष्काळयात्रा : नावापुरतंच पाणी असलेली जलाची वाडी
तेथेच एक विहीर होती. ते पाणी का नाही घेत विचारलं तर गावकरी म्हणाले आत पाहा. फार काही चांगलं नव्हतंच ते. गावकऱ्यांचा आणखी एक राग आहे. त्या विहिरीचे बांधकाम या डबक्याला जास्त पाणी देणाऱ्या झऱ्यावर झाले आहे. तसंच विहीर बांधताना गावकरी खूप राबले होते. ज्या भांड्यामधून पाणी नेतात त्याच भांड्यांमधून घरी पाणी ओतून खाली येताना रेती, विटा आणायचे. सिमेंटच्या गोण्या पाठ मोडीपर्यंत वाहिल्या. राबराब राबले. विहीर झाली आणि मग अधिकाऱ्यांनी नळाद्वारे पाणी गावात काही पोहोचवलेच नाही. आपल्याला फसवल्याच्या भावनेनं गावकऱ्यांचा राग.
आता पुरेसं पाणी मिळत नसल्यानं गावकऱ्यांना डबक्याच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. काही जणांनी ते पाणी हंड्यांमध्ये, छोट्या कळशांमध्ये भरलं. मी त्यांना विचारलं हे असं पाणी तुम्ही पिता कसं? त्याने बोट दाखवलं...काही गावकरी ते पित होते. तसंच न गाळलेलं. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर ते म्हणाले काही होत नाही. त्यांनी डबक्याकडे बोट दाखवलं तर एक गावकरी थेट डबक्यातून ते पाणी पित होता. कसलं आरोग्य आणि कसलं काय. जगायचं कसं हा प्रश्न समोर असताना काय सांगणार त्यांना!
कुणीच काही करत नाहीत. फक्त मतांसाठी येतात. पण पाणी काही देत नाहीत. पण सरकारी यंत्रणेनं काहीच केलं असंही नाही. सरकारी यंत्रणेनं टाक्या बांधल्याही. पण त्यातील पाणी गावासाठी सोडले नाही. गावकऱ्यांना कळतच नाही सरकार असं वागतंय तरी का?
प्रचंड पाऊस पडणारा रायगड जिल्हा....त्याच रायगडातलं नावापुरतंच पाणी उरलेलं जलाची वाडी गाव. लाज आणणारं. रायगडमध्ये महामूर पाणी. पण तेथेच हे पाण्यासाठी तडफडणारं. विकासाच्या लखलखाटातील अंधाराची बेटंच ही. कधी या अंधाराच्या बेटांचं भाग्य उजळणार...
VIDEO | रायगडमधील तहानलेल्या 'जलाच्या वाडी'ची गोष्ट | दुष्काळयात्रा | भाग 1 | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget