एक्स्प्लोर

कर्जतमध्ये पत्नीसह दोन मुलांची हत्या करुन डॉक्टरची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावात पत्नीसह दोन मुलांना मारुन डॉक्टरने आत्महत्या केली आहे.मुलाला कमी ऐकू येत असल्यानं समाजात अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं महेंद्र थोरात यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे.

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील राशीन गावात पत्नीसह दोन मुलांना मारुन डॉक्टरने आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. राशीनमधील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरी पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईन द्वारे इंजेक्शन देऊन स्वत: गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.

राशीन मधील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी त्यांच्या राहत्या घरी पत्नी आणि दोन मुलांना मारुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डॉक्टर महेंद्र थोरात, वर्षाराणी थोरात, कृष्णा थोरात आणि कैवल्य थोरात अशी चौघा मृतांची नावं आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

महेंद्र थोरात यांनी आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली. सुरुवातीला महेंद्र यांनी आपली पत्नी वर्षाराणी, मुलगा कृष्णा आणि कैवल्य यांना सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेनंतर कर्जत पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहेत

दरम्यान महेंद्र थोरात यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत 'आपला थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत आहे, त्यामुळे त्याला समाजात अपमानास्पद वागणूक मिळत आहे. हे आम्हाला अपराध्यासारखे वाटत आहे, त्यामुळे व्यथित होऊन मी आणि माझ्या पत्नीने मिळून हा निर्णय घेतला आहे आणि आत्महत्या करत आहोत', असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

महेंद्र थोरात यांची गरिबांचे डॉक्टर अशीही ओळख होती. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमुळे राशीन गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर या घटनेमुळे राशीन गावांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या महेंद्र थोरात यांनी आत्महत्या केल्याने कर्जत तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला, पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला; पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला
पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC : 'Dhananjay Munde दहा बायका करा पण कुणाचा खून करु नका!'Boisar Tarapur MIDC Fire : आगीचे लांबच लांब लोळ, धुराचे लोट; कारखान्याच्या आगीची Drone दृश्यNana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडलेDal Lake Shrinagar : काश्मीरी शॉल, साड्या, मफलर; 'दल लेक' तरंगत्या शहराची सफर Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला, पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला; पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला
पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला
Mutual Fund : 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील  गुंतवणुकीवर नफ्याऐवजी तोटा, यादी एका क्लिकवर
गुंतवणूकदारांचं नियोजन फसलं, 2024 मध्ये SIP केली पण गणित चुकलं, 34 इक्विटी म्युच्यूअल फंड्समधील गुंतवणूक तोट्यात
प्राजक्ता माळी यावर बोलणार नाही, कल्याण-बदलापूर घटनेवर फिल्म इंडस्ट्रीतलं कोणीच बोललं नाही; वडेड्डीवार संतापले
प्राजक्ता माळी यावर बोलणार नाही, कल्याण-बदलापूर घटनेवर फिल्म इंडस्ट्रीतलं कोणीच बोललं नाही; वडेड्डीवार संतापले
Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले
Nana Patole Mother Funeral : आईला लेकाचा निरोप, नाना पटोले ढसढसा रडले
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचा 19 व्या हफ्ता मिळवण्यासाठी 'या' 2 गोष्टींची पूर्तता करा 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचा 19 व्या हफ्ता मिळवण्यासाठी 'या' 2 गोष्टींची पूर्तता करा 
Embed widget