एक्स्प्लोर

कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई

पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांच्या नगरमध्ये राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांचं नाव पालकमंत्री म्हणून देण्यात आलं होतं. तर हसन मुश्रीफांच्या कोल्हापुरात बाळासाहेब थोरात पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. अशी अदलाबदल कशासाठी करण्यात आली, याच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई सुरु असल्यामुळे त्यावर तोडगा म्हणून हा मार्ग काढल्याचं बोललं जात आहे.

कोल्हापूर : राज्यातल्या पालकमंत्र्यांची यादी परवा जाहीर झाली. पण ही यादी महाविकासआघाडीतल्या अंतर्गत रस्सीखेचासाठी नवं कारण बनल्याचं समोर येत आहे. त्यातही कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदावरुन बरंच अंतर्गत राजकारण सुरू आहे. सरकार बनलं, शपथविधी झाला, त्यानंतर रखडलेलं खातेवाटपही झालं. खातेवाटपानंतरचे रुसवेफुगवे दूर झाले. यासर्व राजकीय नाट्यानंतर सरकार कामाला लागेल असं वाटत होतं. पण चित्र वेगळचं दिसत आहे. अजून एका गोष्टीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. ती गोष्ट म्हणजे, पालकमंत्रीपद. त्यातल्या त्यात कोल्हापूरचं मंत्रीपद कोणाकडे जाणार यावरून नवीन मुद्दा चर्चेत आला आहे. कारण एबीपी माझाशी बोलताना बाळासाबेह थोरात यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांच्या नगरमध्ये राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांचं नाव पालकमंत्री म्हणून देण्यात आलं होतं. तर हसन मुश्रीफांच्या कोल्हापुरात बाळासाहेब थोरात पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. अशी अदलाबदल कशासाठी करण्यात आली, याच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. कोल्हापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीत वर्चस्वाची लढाई सुरु असल्यामुळे त्यावर तोडगा म्हणून हा मार्ग काढल्याचं बोललं जात आहे. पाहा व्हिडीओ : कोल्हापूरचं पालकमंत्रीपद स्वीकारणार नाही : बाळासाहेब थोरात  कोल्हापुरात तीन मंत्री आहेत. राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ कॅबिनेट मंत्री तर काँग्रेस सतेज पाटील आणि शिवसेनेच्या कोट्यातून येड्रावकर असे दोन राज्यमंत्री आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर या सर्वच जिल्ह्यांत राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे किमान कोल्हापुरात तरी आपला पालकमंत्री असावा यासाठी काँग्रेस आग्रही आहे. पण सतेज पाटलांची आक्रमक कार्यशैली राष्ट्रवादीला जिल्ह्यात अडसर ठरु शकते, या भीतीनं त्यांच्या नावाला मात्र विरोध सुरू आहे. जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री असताना राज्यमंत्र्याकडे पालकमंत्रीपद कसं हा युक्तीवाद त्यासाठी केला जात आहे. पालकमंत्रीपद आपण स्वीकारणार नाही हे आता थोरातांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसमध्ये विश्वजीत कदम हे एकमेव मंत्री आहेत ज्यांच्याकडे पालकमंत्रीपद नाही. त्यामुळे थोरातांनी कोल्हापुरचा दावा सोडल्यानंतर तिथं कुणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कोल्हापूर हा भाजप प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा आहे. मात्र हाच जिल्हा भाजपमुक्त झाला आहे. त्यात सतेज पाटलांच्या 'आमचं ठरलंय' या पॅटर्नचाही बराच वाटा आहे. सतेज पाटील यांना सध्या भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे आता थोरातांनी कोल्हापुरचं पालकमंत्रीपद सोडल्यानंतर ते सतेज पाटलाकंडे येणार की, राष्ट्रवादी पुन्हा हट्टानं कोल्हापूर मागून नगर काँग्रेससाठी सोडणार याची उत्सुकता आहे. संबंधित बातम्या :  सतेज पाटीलच कोल्हापूरचे पालकमंत्री होणार? तानाजी सावंत यांची नाराजी मिटेना, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मराठवाड्याच्या बैठकीलाही दांडी

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget