एक्स्प्लोर
चंद्रपुरातील जनआक्रोश सभेआधीच स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये फूट
विदर्भात होणाऱ्या जनआक्रोश सभेआधीच स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेश पुगलिया यांनी वेगवेगळ्या सभेचं आयोजन केलं. तर या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हजेरी लावणार नसल्याचं समजतं आहे.
चंद्रपूर : विदर्भात होणाऱ्या जनआक्रोश सभेआधीच स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पडली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेश पुगलिया यांनी वेगवेगळ्या सभेचं आयोजन केलं. तर या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हजेरी लावणार नसल्याचं समजतं आहे.
चंद्रपुरातील आजच्या जनआक्रोश सभेसाठी विदर्भातील अनेक काँग्रेस नेते अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. हे सर्व नेते चंद्रपुरात दाखल होणार आहेत. मात्र, ते नरेश पुगलिया आयोजित किसान मजदूर रॅलीमध्ये हजेरी लावणार आहेत.
वास्तविक, विजय वड्डेटीवार आणि नरेश पुगलिया यांच्यातील वादामुळे प्रदेश काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विरोधातील गट आता एकत्र येत असल्याचं दिसत आहे. हा गट पुगलिया यांच्या बाजूने उभा आहे.
यामध्ये माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, नागपूरमधील एकमेव विद्यमान काँग्रेस आमदार सुनील केदार आदी नेत्यांचा समावेश आहे. ही सर्व नेते मंडळी पुगलियांच्या किसान मजदूर रॅलीला हजेरी लावतील, अशी माहिती आहे.
दुसरीकडे यातून विलास मुत्तेमवार, विलास ठाकरे विरुद्ध सतीश चतुर्वेदी, अनीस अहमद, नितीन राऊत हा वाद चव्हाट्यावर आला आहे. तर यवतमाळमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना वर्चस्व दिलं गेल्याने, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे आदी नेत्यांनी पुगलियांच्या बाजूने जाताना दिसत आहेत.
दरम्यान, या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी तीन दिवसांपूर्वी सर्व नेत्यांची बैठक घेतली. मात्र, तरीही यातून काहीही साध्य झालेलं दिसत नाही. अशोक चव्हाणांच्या मध्यस्थीनंतरही चंद्रपुरातच दोन कार्यक्रम होत आहेत.
या प्रकरणी नरेश पुगलिया यांनी आपणही एकच कार्यक्रम घेण्याची तयारी दर्शवली होती, मात्र, दोन्ही कार्यक्रम रद्द करुन एकच तारीख ठरवण्याच्या आमची मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे काँग्रेसचे दोन कार्यक्रम चंद्रपुरात होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
करमणूक
वाशिम
Advertisement