(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MNS BJP Alliance : मनसे-भाजप युतीवर संदीप देशपांडे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले....
MNS BJP Alliance : 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे.
MNS BJP Alliance : शिवसेनेसोबतची युती तुटल्य़ानंतर भाजपनं मनसेसोबत युती करण्यासाठी पावले उचलली आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून मनसे-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरु आहे. गेल्या महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानतर गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसे-भाजप युती होणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. या चर्चा सुरु असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपसोबतच्या युतीवर महत्वाची माहिती दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना देशपांडे म्हणाले की, ‘भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा झाली आहे. पण अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील.’
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, ‘भाजपसोबतच्या युतीवर चर्चा झाली आहे. पण मनसेची परिस्थिती चांगली आहे. अनेकांची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचा कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजपसोबतच्या युतीचा आगामी निर्णय राज ठाकरेच घेतील. कोरोनाकाळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कामं केली आहेत. रुग्णालयातील जास्त असणारी बिलं कमी करण्याचं मोठं काम केलं आहे. कोरोना काळात काम करताना आमचे अनेक कार्यकर्ते पॉझिटिव्ह झाले होते. काहींचा यामध्ये मृत्यूही झाला. राज्यातील एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपातही मनसे कार्यकर्ते मदतीसाठी धावले. संपातील कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय केली. शिवया खाणेही पुरवलं. एसटीबाबत सहानुभूती भूमिका दाखवली पाहिजे. महामंडळ कधीच नफ्यामध्ये येणार नाही. पब्लिक ट्रान्सपोर्टबाबत त्या त्या सरकारने विविध राज्यात चांगली भूमिका घेतली आहे. तशीच पावल महाराष्ट्रात उचलायची गरज आहे.’
राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लोकांच्या मनात नकारात्मक भूमिका आहे. एकही गोष्ट या सरकारने पूर्ण केली नाही. कोरोना काळ, परीक्षा, एस टी संप काहीच नीट धड भूमिका घेतली नाही, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
मनसे-भाजप युती का?
2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. शिवसेनेनं साथ सोडल्यानंतर भाजप नव्या मित्रपक्षासोबत युती करण्यास उत्सुक आहे. भाजपा आणि मनसे युती होऊ शकते, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. या युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मराठीचा मुद्दा लावून धरणाऱ्या मनसेने गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाची वाट धरल्याचेही पाहायला मिळालं. भाजपही हिंदुत्वाच्या विचारसरणीला मानणारा पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्व दोन्ही पक्षांना जोडणार समान धागा आहे. राजकारणात काहीही अशक्य नसतं, त्यामुळे भविष्यात या दोन पक्षांमध्ये युतीची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
आगामी निवडणुकांसाठी मनसे सज्ज; राज ठाकरे 10 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर