एक्स्प्लोर

Holi 2022 : वर्ध्याच्या सुरगांवमध्ये अनोखं धुळीवंदन, रंग न उडवता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार, 25 वर्षांची अखंड परंपरा कायम

आज देशभरात मोठ्या उत्साहात रंगाची उधळण होत असताना वर्ध्याच्या सुरगांवमध्ये मात्र एका वेगळ्या पद्धतीने धुळीवंदन साजरे केले जात आहे.

Wardha Holi : वर्धा जिल्ह्यातील  सेलू तालुक्यातील सुरगांव येथे धुलिवंदन साजरा करण्याचा एक आगळा-वेगळा सोहळा साजरा केला गेला. येथील नागरिकांनी रंगांची उधळण न करता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची उधळण करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून येथील गावकरी इतर गावांप्रमाणे होलिका दहन किंवा रंग उधळत जोरजोरात गाणे वाजवत होळी साजरी करणे पसंत करत नसून धुलिवंदनच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करून गाव आदर्श बनविण्यासाठी येथील गावकरी प्रयत्न करतात. त्यासाठी दरवर्षी पहाटे राष्ट्रसंतांची पार्थना त्यानंतर प्रभातफेरी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. विशेषतः यात गावातील चिमुकल्यांचा मोठ्या उत्साहात सहभाग असतो.

मागील वर्षी कोरोनामुळे पडला होता खंड

या गावातील आदर्श असा धुलिवंदन सोहळ्यावर कोरोनाने विरजण घातलं होतं आणि दरवर्षी प्रमाणे प्रभातफेरी आणि गर्दीचे कार्यक्रम आयोजित करता आले नव्हते. मात्र या वर्षी पुन्हा नव्या उत्साहात नव्या आनंदात गावकऱ्यांनी एकत्रीत येत प्रभातफेरी काढली आणि भजने आणि अनेक गीत गाऊन धुलिवंदन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केले. यावेळी "आम्ही आम्हाला धन्य समजतो की आम्ही सुरगावचे रहिवासी आहोत " अशा प्रतिक्रिया व्यक्त करत गावकऱ्यांनी दिल्या.

विदर्भात पसरली सुरगावची ख्याती 
     
मागील 20 ते 25 वर्षांपासून सुरू असलेल्या सुरगांव येथील आदर्श अशा रंगाविना धुलिवंदन सोहळ्याची ख्याती संपूर्ण विदर्भात पोहचली आहे. येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत अनोखा असा रंगाविना धुलिवंदन सोहळा साजरा केला जातो.होळी पेटवणे म्हणजे नैसर्गिक संपत्तीची म्हणजे निसर्गातील झाडांची हानी आणि धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे निसर्गाला धोक्यात घालून सण उत्सव साजरे करणे गावकऱ्यांना पटत नाही आणि देवाने दिलेला सुंदर देह होळीचा रंगानी का खराब करायचा म्हणूनही धुलिवंदन साजरे केले जात नाही. असं गावकरी सांगतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget