एक्स्प्लोर

Dhulivandan : आज सर्वत्र धुलिवंदनाचा उत्साह; कुठलेही निर्बंध नाहीत पण...

Dhulivandan Guidelines : होळीच्या (Holi 2022)  दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा उत्साह असतो. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसमुळं (coronavirus) सणांवर निर्बंध असल्यानं साजरे होऊ शकले नाहीत.

Holi Dhulivandan Guidelines : होळीच्या (Holi 2022)  दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा उत्साह असतो. गेली दोन वर्ष कोरोना व्हायरसमुळं (coronavirus) सणांवर निर्बंध असल्यानं साजरे होऊ शकले नाहीत. यंदा मात्र कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. 17 तारखेला होळी आणि आज 18 तारखेला धुलिवंदनाचा सण निर्बंधमुक्त साजरा केला जाणार आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र, या सणाच्या निमित्ताने गृहखात्याने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 

राज्याच्या गृहखात्याकडून मार्गदर्शक सुचना व नवी नियमावली

-कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा.

-एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. परंतु यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.

-होळी, शिमग्यानिमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.

- तसेच गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी. 

-कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे

मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं

कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्यानं मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. काल 17 तारखेला होळीचा सण महाराष्ट्रात साजरा केला गेला. निर्बंध हटवल्यानं होळीच्या सणाचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळाला. राज्यातील विविध भागांमध्ये आपापल्या परंपरांनुसार होळी साजरी करण्यात आली.

संबंधित बातम्या

Share Market : दलाल स्ट्रीटवर रंगांची उधळण; Sensex मध्ये 1,047 तर  Nifty मध्ये 311 अंकांची उसळण

Holi 2022 : होळी आधी आणि नंतर 'अशी' घ्या त्वचेची काळजी; फॉलो करा तज्ज्ञांनी दिलेल्या सोप्या टिप्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 March 2025 :  ABP Majha : 5 PmPrakash Solanke Statement | मी फक्त 10 ते 12 कोटी खर्चून निवडणूक जिंकलो; सोळंकेंचं वक्तव्य, अडचणी वाढणार?Bhaskar Jadhav Full Speech : ⁠काम झालं..दादांचं गुलाबी जॅकेट निघालं; भास्कररावांच्या रडारवर फक्त 'दादा'ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
Video: 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार; भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
उध्दव ठाकरेंना ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, ते बजेट काय सांगणार? रामदास कदमांचा हल्लाबोल 
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
गृहनिर्माण सोसायट्यांच्या गाळ्यात दारुदुकान सुरु करण्यासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, अजित पवारांची मोठी घोषणा
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजी महाराजांचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यालादरम्यान पीसीबीचा एकही अधिकारी का नव्हता?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यालादरम्यान पीसीबीचा एकही अधिकारी का नव्हता?
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.