एक्स्प्लोर
धुळ्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोलेंना मारहाण
धुळे: धुळ्यातील साक्री येथे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ शंकर ढोले गंभीर जखमी झाले आहेत.
हुंडाविरोधी अंतर्गत एका दाखल करण्यात आलेल्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्याच्या कारणावरुन दोन गटात पोलीस ठाण्यातच जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानं त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं.
यावेळी एका गटाकडून लाठ्या, काठ्यानं मारहाण करण्यात आली. तसंच मोठ्या प्रमाणात दगडफेकही झाली. यावेळी जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोले यांचा जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, मारहाण करणारे आरोपी फरार झाले आहेत. साक्री पोलिसांनी मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरू केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement