एक्स्प्लोर

अशी प्रेयसी होणे नाही! प्रियकरासाठी आत्याच्या घरात तंबू ठोकला आणि अपहरणाचा बनाव रचला, पोलिसांनी 'परफेक्ट' शेवट केला

शाजापूर येथे परिवारासह राहायला गेल्यानंतरही संबंधीत तरूणीच्या संपर्कात होती. विनोद नाशिककर व तरूणी यांनी घरातून पळून जाण्यासाठी दरोडा टाकण्याचा कट रचला. 

धुळे : जिल्ह्यातील साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना (Dhule Crime)  यश आले आहे.  संबंधित तरुणीनेच ओळखीच्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता,  हे उघड झाले आहे. पीडित तरुणीनेच पोलिसांना अशी माहिती देण्यात आल्याचे पोलिसी अधीक्षक श्रीकांत धिवरे सांगितले.साक्री येथील सरस्वती नगरातील घरात पाच ते सात दरोडेखोरांनी घुसून महिलेला धारदार चाकू व बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत घरातील सोने, चांदीचे दागिने असा एकूण 88 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता.  तसेच घरातील 21 वर्षीय तरूणीचेही अपहरण केले. याप्रकरणी साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला. त्या अनुषंगाने तपासचक्र फिरवून तरूणीचा शोध घेऊन आई वडीलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या गुन्ह्यातील आरोपी विनोद भरत नाशिककर (वय 38) रा. गायत्रीनगर, शिव मंदिर समोर शाजापूर, सौर उर्जा ठेकेदार मध्यप्रदेश व धुळ्यातील रोहित संजय गवळी (वय 22 रा. मोगलाई) या दोघांना मध्यप्रदेश राज्यातून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनोद नाशिककर हा साक्रीतील आदर्शनगर मधील संबंधित तरूणीच्या घराशेजारी भाडेकरी म्हणून वास्तव्याला असतांना संबंधित तरूणीशी विनोदची ओळख झाली होती. त्यानंतर शाजापूर येथे परिवारासह राहायला गेल्यानंतरही संबंधीत तरूणीच्या संपर्कात होती. विनोद नाशिककर व तरूणी यांनी घरातून पळून जाण्यासाठी दरोडा टाकण्याचा कट रचला. 

कसा रचला बनाव?

आदर्श नगरातून पळून जाणे शक्य नसल्याने आत्याच्या घरी सरस्वती नगरात राहण्यासाठी तरूणी गेली. रचलेल्या कटानुसार विनोद नाशिककर याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या अमनसिंग व चरणसिंग यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आणखी दोघांना बोलवून हा सर्व बनाव रचला. ठरल्यानुसार संबंधित तरूणीने रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याबाबत विनोदला सांगितले. ठरल्यानुसार दरोडा टाकण्यात आला. संबंधीत तरूणी, विनोद व त्याचे चारही साथीदार दरोडा झाल्यानंतर साक्रीतून रायपूरबारी येथे पोहचले.  तेथून रोहीत संजय गवळी याने तरूणी आणि विनोद वगळता इतर चौघांना रतलाम रेल्वे स्टेशनला सोडले. आरोपी विनोद आणि तरूणी चारचाकी वाहनातून सर्व टोल नाके वगळून शाजापूरपर्यंत पोहचले. या काळात विनोद नाशिककर संबंधित तरूणीच्या वडीलांच्या संपर्कात राहून घडलेल्या घटनेची माहिती घेत होता.

पोलिसी खाक्या दाखवताच सांगितली सर्व हकिकत

या सर्व घटनेचे गांभीर्य ओळखून विनोदने तरूणीला पंधराशे रुपये देऊन ट्रॅव्हल्सने परत पाठविले. ट्रॅव्हल्समधून तरूणीने कोणत्यातरी प्रवाशाच्या मोबाईलवरून विनोदच्या मोबाईलवर कॉल केला. तरूणी मध्यप्रदेश येथील सेंधवा येथे असल्याची माहिती धुळे पोलीसांना मिळाली. तरूणीला घेऊन पोलीसांनी आई वडीलांच्या ताब्यात दिले. तरूणीने आईवडीलांच्या मोबाईलवरून विनोद याला फोन करून साक्रीत पोहचल्याचे सांगितले तसेच मोबाईल फॉरमॅट करून टाकण्याचे सांगितले. त्यानुसार विनोदने मोबाईल फॉरमॅट देखील केला. मात्र हा बनाव असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच संबधित तरुणीला पोलिसी खाक्या दाखवताच तिने सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.  या प्रकरणी पोलिसांनी विनोद नाशिककर याला अटक करून पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : पाकिस्तान टिपू सुलतानाला हिरो मानतं तर त्यांच्यासोबत क्रिकेट कसं खेळू शकता
Raghuvir Khedkar Majha Katta: डीजे,लावण्यांचं आक्रमण तमाशाच्या मुळावर? रघुवीर खेडकरांचा 'माझा कट्टा'
Jayant patil on Ajit pawar : माझी आणि दादा यांची 11 वेळा भेट झाली होती, विलिनीकरणावर जयंत पाटील काय म्हणाले?
Harshwardhan Sakpal vs Devendra Fadnavis on Tipu Sultan : टिपू सुलतानवरुन टीकेची तलवार
Dombivli Fire: डोंबिवलीत पहाटे भीषण आग, बेसमेंट पार्किंगमध्ये 29 दुचाकी जळून खाक; पाच जण जखमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Narhari Zirval: मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
मंत्रालयातील लाच प्रकरणानं मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत? आता विभागाला दिले महत्त्वाचे आदेश
Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
India Vs Pakistan: टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे हे 6 धुरंदर आज पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात हायव्होल्टेज थरार प्रत्यक्ष मैदानात अनुभवणार!
India Vs Pakistan: वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
वेगवान गोलंदाजीत फक्त बुमराह, टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धची प्लेईंग 11 कशी असणार? कोलंबोची एकंदरीत परिस्थिती पाहता कोणाचा पत्ता ऐनवेळी कट होणार??
Suryakumar Yadav on Usman Tariq: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Video: कॅप्टन सूर्याकडून पाकिस्तानच्या उस्मान तारिकच्या भलत्याच अ‍ॅक्शनची कॉपी; म्हणाला 'हा आमच्या 'अभ्यासक्रमाबाहेर' पण टीम इंडिया त्याला...'
Dharashiv ZP: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला; शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव, फडणवीस-शिंदे आजच निर्णय घेणार?
Narhari Zirwal NCP: नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
नरहरी झिरवळ अडचणीत, राष्ट्रवादी काँग्रेस कोंडीत, सुनेत्रा पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक
Embed widget