एक्स्प्लोर

Dhangar Reservation : मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा; राज्यस्तरीय अधिवेशनात एकमताने ठराव पारित 

मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाच्या आरक्षणाचे एसटी प्रवर्गात अंमलबजावणी करण्यासह इतर मागण्यासाठी आज अमरावती येथे आजोजित राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशनात एकमताने ठराव पारित करण्यात आला आहे.

Amravati News अमरावती : धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज अमरावतीमध्ये (Amravati) राज्यस्तरीय धनगर समाज अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मराठा आरक्षणाप्रमाणे (Maratha Reservation)धनगर समाजाच्या आरक्षणाचे (Dhangar Reservation) एसटी प्रवर्गात अंमलबजावणी करा, सोबतच केंद्र सरकारने धनगरांसाठी एक हजार कोटीची योजना आखली होती. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ही योजना शेवटच्या धनगर बांधवांपर्यंत पोहोचली नाही, त्यामुळे ती योजना शासनाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावी. हे दोन ठराव या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये एकमताने पारित करण्यात आले आहे.

आता या ठरावाची प्रत राज्य आणि केंद्र सरकारला सुद्धा पाठवण्यात येणार असून याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी या ठरावात करण्यात आली आहे. यावेळी संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर बांधवांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. 

मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणाची अंमलबजावणीची मागणी

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापले असतानाच नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा झटका दिला आहे. धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, या सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) फेटाळून लावल्या. त्यामुळे धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या अपेक्षांना सुरुंग लागला आहे.

राज्यस्तरीय अधिवेशनात एकमताने ठराव पारित 

आता धनगर समाजाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे. असे असतांना ज्याप्रमाणे राज्य सरकारनं मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण मंजूर केलं. त्याच धर्तीवर धनगर समाजाच्या आरक्षणाचे एसटी प्रवर्गात अंमलबजावणी करण्याची मागणी  धनगर समाजाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात करण्यात आली आहे. या मागणीचा ठराव आज एकमताने पारित करण्यात आला आहे. 

गेल्या काही महिन्यांमध्ये धनगर समाजाने अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात आंदोलन आणि मोर्चे काढले होते. सध्या धनगर समाजाला एनटी (भटक्या जमाती) प्रवर्गाचे साडेतीन टक्क्यांचे आरक्षण  आहे. एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असते तर धनगर समाजाचे आरक्षण 7  टक्क्यांवर गेले असते. मात्र, धनगर समाजाला अनुसूचित जातींचे आरक्षण देण्यासाठी पूर्तता आणि पडताळणीचे निकष पूर्ण होत नसल्याचे कारण देत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या. धनगर समाजाची अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रास्त नाही. ती मान्य करता येणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

धनगर आरक्षणाचा नेमका वाद काय?

धनगर बांधवांना सध्या भटक्या जमाती (एनटी) या प्रवर्गातंर्गत आरक्षण मिळत आहे. ते आरक्षण साडेतीन टक्के आहे. 1985 साली यशवंत सेनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी केली. तेव्हापासून ही मागणी प्रलंबित आहे. केंद्र सरकारची आरक्षणाची  जी यादी आहे त्यामध्ये धनगड जातीला एसटी प्रवर्गाचे आरक्षण आहे. मात्र, धनगर आणि धनगड हे दोन्ही शब्द एकच आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शब्दाचा अपभ्रंश झाला. धनगड अशी कोणतीही जातच नाही. त्यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी वर्षानुवर्षे आंदोलन सुरु आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024Pankaja Munde On Politics : काहींना वाटतं अभद्र बोलणं म्हजणे चांगलं...पंकजा मुंडेंचा रोख कुणारवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 04PM : 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 05 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
उशिने तोंड दाबून पत्नीचा खून, स्वत:ही संपवले जीवन; 5 वर्षांची चिमुकली पोरकी, बीडमधील ह्रदयद्रावक घटना
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
अहमदनगरमध्ये मतदानाच्या एकदिवसआधीच राडा, स्कॉर्पिओ अन् कार्यालयही फोडलं, पोलीस फौजफाटा तैनात
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळेंचा भाजपामध्ये प्रवेश
Embed widget