एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापुरची धनश्री गोडसे बनली मिस इंडिया
27 स्पर्धाकांमध्ये अंतिम फेरीत 'शिक्षण हे तलवारीपेक्षा सामर्थ्यवान आहे या उत्तरानेच धनश्रीने सर्वांची मनं जिंकली.
कोल्हापूर : कोल्हापुरच्या धनश्री गोडसे हिने जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत 2019 च्या 'मिस इंडिया' किताबावर आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत 27 स्पर्धाकांमध्ये सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर तिने हा पुरस्कार पटकावला.
इंडियन फॅशन फियास्टातर्फे जयपूर येथे 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा सपंन्न झाली. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातून सहा हजारांपेक्षा जास्त स्पर्धाकांनी भाग घेतला होता. ज्यात अंतिम 27 स्पर्धक निवडले गेले होते. या 27 स्पर्धाकांमध्ये अंतिम फेरीत 'शिक्षण हे तलवारीपेक्षा सामर्थ्यवान आहे या उत्तरानेच धनश्रीने सर्वांची मनं जिंकली.
धनश्री गोडसे ही मुळची सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील फूट या गावची आहे. धनश्रीचे वडील धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते. 2014 साली त्यांची कोल्हापुरात बदली झाली होती. सध्या ते बारामती येथे कार्यरत आहेत.
वडील पोलीस निरीक्षक असल्याने त्यांची सारखी बदली व्हायची, त्यामुळे तिचं दहावीपर्यंतचं शिक्षण विविध 9 शाळांमध्ये झाले आहे. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची मुलगी ही या ठिकाणापर्यंत पोहोचण्याची ही पहिली वेळ आहे.
धनश्रीला इयत्ता 10 वीमध्ये 94 टक्के गुण मिळाले होते. त्यांनतर तिचं महाविद्यालयीन शिक्षण विवेकानंद कॉलेजमध्ये झाले. सध्या ती सांगलीतील भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे.
या स्पर्धेत शारीरिक सौंदर्यासोबतच हजरजबाबीपणा व्यक्तिमत्त्व, धाडस, कपड्यांची निवड या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर निवड केली जाते. ह्या सर्व कसोटी पार करुन धनश्रीने मिस इंडियाचा किताब आपल्या नावावर केला. धनश्रीने स्पर्धेतील यशाचे श्रेय तिच्या आई-वडिलांना दिलं आहे.
यानंतर जून आणि जुलैमध्ये इंडोनेशिया येथे होणार्या मिस इंटरनॅशनल स्पर्धेत धनश्री भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement