काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात, धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका
कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटातच्या काळात मदतीला आले नाही, असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला.
बीड : पंकजा मुंडे यांनी काल झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. आज धनंजय मुंडे यांनी जाहीर कार्यक्रमातून या टीकेला उत्तर दिलं आहे. काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण होत नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.
पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली. कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले. संकटातच्या काळात मदतीला आले नाही, असं म्हणत नाव न घेता धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना टोला लगावला. आम्ही सुद्धा 2014 मध्ये पराभूत झालो पण जनतेला वाऱ्यावर सोडलं नव्हतं असंही धनंजय मुंडेंनी म्हटलं. येडेश्वरी शुगरच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
...नाहीतर उसाच्या फडातून कामगार बाहेर आणू, पंकजा मुंडेंचा इशारा
पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कर्ज वाढत आहे, हे सांगताना धनंजय मुंडे यावेळी म्हणाले की, बजरंग सोनवणे यांनी सात वर्षात कारखाना फेडला. सात वर्षात आमच्या वैद्यनाथ कारखान्यात 250 कोटी कर्ज वाढलं. तरी सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस पडून राहू नये म्हणून आम्ही राजकरण न करता थकहमीची जबाबदारी घेतली.
ऑनलाईन दसरा मेळावा घेणाऱ्या पंकजा मुंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल
ऊसतोड मजुरांना राज्य सरकार योग्य दरवाढ करेल. जाणीवपूर्वक ऊसतोड मजूर महामंडळ माझ्या विभागाकडे घेतलं आहे. विशेष साहाय्य करून ऊसतोड मजुरांचे कायमचे प्रश्न सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
दरम्यान ऊसतोड मजुरांच्या बाबतीत आपण पूर्वीच्या सरकार प्रमाणे केवळ गप्पा मारणारे नसून प्रत्यक्ष कृती करणारे आहोत. ऊसतोड कामगारांच्या जीवनात आर्थिक उत्कर्ष साधून, मजुराचा ऊस उत्पादक झाला पाहिजे, तेव्हाच खरे समाधान मिळेल असेही मुंडे म्हणाले.