एक्स्प्लोर

Dhananjay Deshmukh: 'आरोपींना अभय दिलं नसतं तर खून झाला नसता', CCTV सापडल्यानंतर धनंजय देशमुखांचा यंत्रणेवर ठपका, म्हणाले..

Dhananjay Deshmukh: याची जबाबदारी सीआयडी एसआयटीवर आहे .या सगळ्यांची उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात हवी आहेत तोंडी घेणार नाही .असं धनंजय देशमुख म्हणाले .

Dhananjay Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी पुण्याच्या दिशेने जातानाचा एक सीसीटीव्ही समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे . या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असा ठपका असणाऱ्या वाल्मीक कराडने (Walmik Karad) 31 डिसेंबर 2024 ला शरणागती पत्करण्यापूर्वी 3 आलिशान गाड्यांमधून बीड -मांजरसुंबा via पुण्यात जातानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे . याच गाड्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची पांढरी स्कॉर्पिओ (white Scorpio)असल्याचाही सांगण्यात येत आहे .या गाड्यांमधूनच आरोपींना फरार करण्यासाठी मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपींना अभय दिलं नसतं तर खून झाला नसता. आता मात्र यंत्रणेवर शंका येत आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही असा सवाल केला आहे .याबाबत आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचंही धनंजय देशमुख म्हणालेत . (Santosh Deshmukh Case)

काय म्हणाले धनंजय देशमुख ?

मला यंत्रणेवर शंका येत आहे .याचे कारण सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांना भेटतात मग यंत्रणा त्यांच्यापर्यंत का पोहोचत नाही ?माझ्या भावाचे ज्या आरोपी आहेत त्यांना शिक्षा देताना हे महत्त्वाचे आहे .माध्यमांना व्हिडिओ मिळतात मग यंत्रणेने केलं काय ?आमचा विश्वासघात झाला तर याला जबाबदार कोण याचे उत्तर आम्हाला हवं आहे .यंत्रणेने आत्तापर्यंत काय काय हस्तगत केले याची माहिती देशमुख कुटुंबाला दिली पाहिजे .यासाठी आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत .जी घटना घडली त्यानंतर आरोपी सर्व जिल्ह्यात होते .सरेंडर होण्यासाठी त्या जिल्ह्याच्या बाहेर गेले . याची जबाबदारी सीआयडी एसआयटीवर आहे .या सगळ्यांची उत्तर आम्हाला लेखी स्वरूपात हवी आहेत तोंडी घेणार नाही .असं धनंजय देशमुख म्हणाले .

आरोपींना अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता- धनंजय देशमुख

आता मला संशय येतोय आरोपींना  फरार करण्यात आणि आसरा देण्यास मदत करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही ? या गोष्टीवर मला शंका आहे . याची माहिती मी घेणार आहे .जे समोर येत आहे त्यावर पोलीस यंत्रणा व्यक्त झाली नाही .कराड यांना कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये अधिक राहायचे आहे .आम्ही पीडित कुटुंब आहे .यंत्रणा काय कारवाई केली पाहिजे हे त्यांनी ठरवलं पाहिजे .आरोपींना अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय .

हेही वाचा:

Walmik Karad: 3 आलिशान गाड्या, CIDला शरण येण्याआधी मांजरसुंब्यात जेवण केलं,वाल्मीक कराडनं पुण्यात कसा पळ काढला?

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
महाराष्ट्र हीच देवेंद्रजींची कर्मभूमी, ते इथं चांगल काम करतायेत, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचं वक्तव्य 
महाराष्ट्र हीच देवेंद्रजींची कर्मभूमी, ते इथं चांगल काम करतायेत, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचं वक्तव्य 
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget