एक्स्प्लोर

Walmik Karad: 3 आलिशान गाड्या, CIDला शरण येण्याआधी मांजरसुंब्यात जेवण केलं,वाल्मीक कराडनं पुण्यात कसा पळ काढला?

.शरणागती पत्करण्याचा आधी गेले आठ दिवस तो कुठे होता याचे उत्तर देण्यास वाल्मीक कराडने नकार दिला होता . याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.

Walmik Karad Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेगाला असून आत्तापर्यंत 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे .या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे .वाल्मीक कराडसह (Walmik Karad) त्याच्या दोन्ही पत्नींच्या संपत्तीबाबतही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर CIDला शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराड बीड वरून पुण्याला गेला होता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे . याबाबत पुष्टी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत . पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मीक कराडचा मांजरसुंबा via पुण्यात आलिशान गाड्यांमधून पळ काढल्याचे CCTVसमोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे . (Santosh Deshmukh Case)

वाल्मीक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात 31 डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केल्याने मोठी खळबळ उडाली होती . पांढऱ्या स्कॉर्पिओ (White Scorpio) मधून वेगाने पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करण्यासाठी आलेल्या वाल्मीक कराडला पोलिसांनी ताब्यात घेतले .त्यानंतर सीआयडीच्या चौकशीचे सत्र सुरू झाले .शरणागती पत्करण्याचा आधी गेले आठ दिवस तो कुठे होता याचे उत्तर देण्यास वाल्मीक कराडने नकार दिला होता . याबाबत आता मोठी बातमी समोर आली असून शरणागती पत्करण्यापूर्वी 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 3 आलिशान गाड्यांमधून आरोपीला पुण्याला नेल्याची चर्चा आहे . याला पुष्टी देणारे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे . 

काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये ?

खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेले होते का असा सवाल उपस्थित केला जात असताना याबाबतीत पुष्टी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत .यात 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याचं सांगण्यात येत आहे .बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर जेवण केले .तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले .त्यानंतर या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या .या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेला अशी चर्चा आहे .याच आलिशान गाड्यांमधून आरोपींना फरार होण्यास मदत केली असावी अशी शंका उपस्थित होत आहे .विशेष म्हणजे पाषाण येथे सीआयडीच्या ऑफिसला शरण येताना ज्या व्हाईट स्कॉर्पिओ मधून वाल्मीक कराडाला ती गाडी याच ताफ्यातील असल्याचं समोर आलं आहे . पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ MH 23 BG 2231 ही शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची असल्याची माहिती सूत्रांनी दिली .

संतोष देशमुख हत्या प्रकरणात शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मीक कराड आणि त्याचे साथीदार पुण्याला कसे पळाले याबाबत सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे .एकीकडे अटकेतील आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे .दरम्यान शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मीक कराड मांजरसुंबा तर त्याचा दुसऱ्या पत्नीकडे राहायला असल्याची ही माहिती उघड झाली होती .त्यानंतर नुकत्याच हाती लागलेल्या माहितीनुसार, बीड मधून मांजरसुंबातील हॉटेलमध्ये  जेवण करून गाडीत डिझेल भरून तीन आलिशान गाड्यांमधून वाल्मीक कराड पुण्याला गेल्याचे सांगण्यात येत आहे .

हेही वाचा:

Walmik Karad: वाल्मिक कराडची तब्येत बिघडली; सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु, रात्री नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget