देवेंद्र फडणवीस तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचं आरक्षण नाकारलं होतं, शरद पवार गटाचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूरमधून मंडल यात्रेला (Mandal Yatra) सुरुवात झाली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला शरद पवार गटानं उत्तर दिलं आहे.
Gondia News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूरमधून (Nagpur) मंडल यात्रेला (Mandal Yatra) सुरुवात झाली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते काल या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी कमंडल दाखवत मुख्यमंत्र्यांना खुलं चॅलेंज दिलं आहे. माझा खुला आरोप आहे की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचं आरक्षण नाकारलं होतं असे राजापूरकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचा आरक्षण नाकारलं होतं
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षाने ओबीसींचा आरक्षण नाकारलं होतं, हे वास्तविक सत्य असल्याचे मत राज राजापूरकर यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निघालेल्या मंडल यात्रेवर टीका करत आता ओबीसींची आठवण आली का? असा सवाल उपस्थित केला होता. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा यात्रेचे संयोजक राज राजापुरकर यांनी खरमरीत टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले राज राजापूरकर?
देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी मंडल आयोगाच्या विरोधात एक कमंडल यात्रा काढली होती.
आपल्या पक्षाने कमंडल यात्रा काढली होती की नाही? काढली होती हे फक्त तुम्ही जाहीरपणे सांगून दाखवा.
ओबीसींना शूद्र समजून त्यांना पवित्र करण्यासाठी क-मंडल मधील पाणी शिंप[न्याचे काम तुम्ही केलं.
ओबीसी सत्तेच्या मुख्य प्रवाहात येऊ नये म्हणून त्याला आरक्षण नाकारण्यासाठी ही कमंडल यात्रा काढली होती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने ओबीसी जनजागरण मंडल अभियान यात्रेला शरद पवार यांच्या उपस्थितीत नागपूर येथुन सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण 36 जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. आज गोंदिया जिल्ह्यात देखील ही यात्रा पोहोचली आहे. ओबीसी बांधवांकडून या यात्रेचे स्वागत करण्यात आले आहे. यावेळी ओबीसी च्या घोषणा देत ओबीसी ची जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी ओबीसी बांधवांनी केली.
महत्वाच्या बातम्या:


















