प्रफुल्ल पटेलांचं नाव आलं होतं, पण राष्ट्रवादीचा मंत्री शपथ घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कुठं बिघडलं
अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येणार नाही. पण मला विश्वास आहे की, ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी त्यांचा विचार होईल, असे फडणवीस म्हणाले.

मुंबई: अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीला (NCP) नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद (Cabinet Expansion) मिळणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनेक तर्क वितर्क राजकीय वर्तुळात लावले जात होते. अखेर देवेंद्र फडणवीसांनी कारण सांगितले आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आलं होते.मात्र राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम होते. मात्र प्रफुल पटेल आधी कॅबिनेट मंत्री असल्यानं अडचण येत होती. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या वतीने राष्ट्रवादीला एक जागा ऑफर करण्यात आली होती. परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडून प्रफुल पटेल यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. ते अगोदर मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येणार नाही. पण मला विश्वास आहे की, ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी त्यांचा विचार होईल.
एनडीए सरकारमधून संधी मिळाली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातून काही अनुभवी आणि तरुण खासदारांना एनडीए सरकारमधून संधी मिळाली त्यांचे अभिनंदन करतो. पियुष गोयल, गडकरी, आठवले सरकारमध्ये सामिल होत आहेत. मोहोळ, रक्षा खडसे असे तरुण खासदार शपथ घेत आहेत. प्रतापराव जाधव यांच्यासारखे अनुभवी खासदार शपथ घेत आहेत.
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार
नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे.. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात मोठ्या थाटात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधी आधी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचीही यादी तयार करण्यात आले आहे. यंदा मंत्रिमंडळात अनेक नवनिर्वाचित खासदारांना संधी देण्यात आल्याचं दिसंत आहे. नरेंद्र मोदींचे नव्या मंत्रिमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्रातून जे मंत्री शपथ घेणार आहेत,
त्यांच्यमध्ये ओबीसी, मराठा, एससी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. तसंच, प्रादेशित समतोलही साधण्यात आला आहे. मुंबईतून पियुष गोयल, उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे, तर विदर्भातून दोन खासदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. मराठवाडा आणि कोकणातून मात्र कुणाच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली नाही.
हे ही वाचा :























