'मतदारांनी पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, सारे काही झुगारून लोकशाही निवडली' देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Sindhudurg District Bank Election result live : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sindhudurg District Bank Election result live : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागी विजय मिळाला. या विजयानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनी म्हटलं आहे की, सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, रवींद्र चव्हाण, सर्व भाजप नेते, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
सरकारी यंत्रणेचा गैरवापर,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2021
पोलिसी दडपशाही,
सत्तेची अरेरावी,
मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय!
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!@MeNarayanRane https://t.co/KgG7hB90Da
11 जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून 11 जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपनं झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व मिळवलं आहे.
निकालाची पाच महत्वाची वैशिष्ट्यं
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागी विजय मिळाला.
- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
- कणकवलीतून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि भाजपचे विठ्ठल देसाईंना समसमान मतं मिळाली. चिठ्ठी टाकून काढलेल्या निकालात विठ्ठल देसाई विजयी झाले. मागील वेळी सावंत बिनविरोध निवडून आले होते.
- भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांच्याविरुद्ध सुशांत नाईक हे आमदार वैभव नाईक यांचे बंधू विजयी झाले. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून राजन तेलींचा पराभव झाला.
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विजय मिळवत राणेंनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.
निवडणुकीत कोण विजयी कोण पराभूत
1) शेती संस्था मतदारसंघ कणकवली तालुका
सतीश सावंत (महाविकास आघाडी)-पराभूत
विठ्ठल देसाई (भाजप)- विजयी
2) शेती संस्था मतदारसंघ कुडाळ तालुका
प्रकाश मोर्ये (भाजप)- पराभूत
विद्याप्रसाद बांदेकर (महाविकास आघाडी)- विजयी
सुभाष मडव (अपक्ष)- पराभूत
3) शेती संस्था मतदारसंघ सावंतवाडी तालुका
गुरुनाथ पेडणेकर (भाजप)- पराभूत
विद्याधर परब (महाविकास आघाडी)- विजयी
4) शेती संस्था मतदारसंघ मालवण तालुका
व्हिक्टर डान्टस (महाविकास आघाडी)- विजयी
कमलाकांत कुबल (भाजप)- पराभूत
5) शेती संस्था मतदारसंघ वेंगुर्ला तालुका
मनीष दळवी (भाजप)- विजयी
विलास गावडे (महाविकास आघाडी)-पराभूत
6) शेती संस्था मतदारसंघ देवगड तालुका
प्रकाश बोडस (भाजप)- विजयी
अविनाश माणगावकर (महाविकास आघाडी)
7) शेती संस्था मतदारसंघ दोडामार्ग तालुका
प्रकाश गवस (भाजप)- पराभूत
गणपत देसाई (महाविकास आघाडी)- विजयी
8) शेती संस्था मतदारसंघ वैभववाडी तालुका
दिलीप रावराणे (भाजप)- विजयी
दिगंबर पाटील (महाविकास आघाडी)- पराभूत
9) नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघ
राजन तेली (भाजप)- पराभूत
सुशांत नाईक (महाविकास आघाडी)- विजयी
10) दोन महिला प्रतिनिधी
प्रज्ञा ढवण (भाजप)- विजयी
अनोरोजीन लोबो (महाविकास आघाडी) पराभूत
11) दोन महिला प्रतिनिधी
अस्मिता बांदेकर (भाजप)- पराभूत
नीता राणे (महाविकास आघाडी)- विजयी
12) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
आत्माराम ओटवणेकर (महाविकास आघाडी)- विजयी
सुरेश चौकेकर (भाजप)- पराभूत
13) इतर मागास मतदारसंघात
रवींद्र मडगावकर (भाजप)- विजयी
मनिष पारकर (महाविकास आघाडी)- पराभूत
14) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ
गुलाबराव चव्हाण (भाजप)- पराभूत
मेघनाथ धुरी (महाविकास आघाडी)- विजयी
15) सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी संस्था मतदारसंघ
अतुल काळसेकर (भाजप)- विजयी
सुरेश दळवी (महाविकास आघाडी)- पराभूत
16) औद्योगिक संस्था मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटार वाहतूक संस्था मतदारसंघ
गजानन गावडे (भाजप)- विजयी
लक्ष्मण आंगणे (महाविकास आघाडी)-
17) मच्छीमार संस्था सर्व दुग्ध संस्था कुक्कुटपालन, वराहपालन जनावरे पैदास करणाऱ्या संस्था मतदारसंघ
महेश सारंग (भाजप)- विजयी
मधुसूदन गावडे (महाविकास आघाडी)- पराभूत
18) विणकर संस्था घरबांधणी संस्था देखरेख संस्था तसेच अंतर्भूत नसलेल्या सर्व सहकारी संस्था
विनोद मर्गज (महाविकास आघाडी) पराभूत
संदीप परब (भाजप)- विजयी
19) कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था सर्व बिगर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ
विकास सावंत (महावि. आघा.)- पराभूत
समीर सावंत (भाजप)-विजयी
हे निकाल धक्कादायक
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे पॅनलचं नेतृत्व करणारे सावंत पराभूत झाले आहेत. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व असलं तरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा पराभव झाला आहे.
कणकवलीतून भाजपचे विठ्ठ्ल देसाई विजयी झाले. समसमान मतं मिळाल्यानं चिठ्ठी टाकून हा निकाल जाहीर झाला. यात विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. सतीश सावंत हे गेल्यावेळी बिनविरोध निवडून आले होते. यंदा मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे भाजपचं वर्चस्व दिसत असलं तर सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा पराभव झाला. याठिकाणी वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक विजयी झाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Sindhudurg District Bank Election Results Live updates : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक: भाजपचा मोठा विजय, भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागा
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची निर्विवाद सत्ता; महाविकास आघाडीचा पराभव, राणे पॅटर्नचा डंका, कार्यकर्त्यांचा जल्लोष
Sindhudurg District Bank Election Results : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत मोठे उलटफेर! सतीश सावंत, राजन तेलींचा पराभव
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा