(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sindhudurg District Bank Election Results Live updates : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक: भाजपचा मोठा विजय, भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागा
Sindhudurg District Bank Election Live updates :संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. पाहा प्रत्येक अपडेट्स
LIVE
Background
Sindhudurg District Bank Election : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडीला धक्का देणार की महाविकास आघाडीचे पॅनेल पुन्हा सत्ता ताब्यात ठेवणार याकडे लक्ष लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत.
गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी तब्बल 968 मतदारांनी म्हणजे 98.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 115 महिला व 853 पुरुषांचा समावेश होता. कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. शांततेत मतदान प्रकिया पार पडली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण 14 विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मतदारांचा कौल कुणाला? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
आज, शुक्रवारी ओरोस येथे सकाळी 9 वाजल्यापासून मतमोजणी ओरोस येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी होणार आहे.
एकूण तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, पहिल्या फेरीमध्ये विकास सोसायटीच्या 8 प्रतिनिधींची मतमोजणी दुसऱ्या फेरीमध्ये संलग्न सहकारी मतदार संघ आणि दोन महिला व तिसऱ्या फेरीमध्ये राखीव मतदारसंघाची मतमोजणी अशी एकूण तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी, मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय! केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सरकारी यंत्रणेचा गैरवापर,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2021
पोलिसी दडपशाही,
सत्तेची अरेरावी,
मतदारांनी सारे काही झुगारून लोकशाही निवडली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय!
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,रवींद्र चव्हाण,सर्व भाजपा नेते,कार्यकर्ते,विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!@MeNarayanRane https://t.co/KgG7hB90Da
ईश्वरी संकेत देखील भाजपच्या बाजूने आहेत- विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर
नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर जबरदस्ती करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याला चोख उत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने दिलं आहे. ईश्वरी संकेत देखील भाजपच्या बाजूने आहेत, असं विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
जनता आमच्या सोबत आहे आणि ईश्वराचे पाठबळ आमच्या सोबत आहे. कितीही यंत्रणा आणि पोलीस वापरले तरी जनतेच्या दरबारात न्याय मिळतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
'आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो', भाजप आमदार आशिष शेलारांचं ट्वीट
देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्...आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो... नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!
देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 31, 2021
विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्...आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो...
नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे.
मा. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत!
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक: नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपचा मोठा विजय, भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक: नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपचा मोठा विजय, भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय
मोठी बातमी..! जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता, दहा जागा जिंकल्या, महाविकास आघाडीला आतापर्यंत सात जागा
मोठी बातमी..! जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता, दहा जागा जिंकल्या, महाविकास आघाडीला आतापर्यंत सात जागा