...तर येणार्या पिढ्या विचारत राहतील, अरे भाई कहना क्या चाहते हो?, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Devendra Fadnavis: आज काही कागदपत्र मी तुम्हाला वाचायला देतो. आदरणीय महात्मा गांधींचं हे पत्र तुम्ही वाचलंय का? 'त्या' पत्रासारख्याच या पत्रातही शेवटच्या ओळी आहेत ज्या मी वाचाव्यात असं तुम्हाला वाटतं का?
Devendra Fadnavis On Rahul Gandhi : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत चोख उत्तर दिलंय. कालही राहुल गांधींनी सावरकर यांचा माफीनाम्याचा दाखला देत सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्राच्या ओळी वाचून दाखवल्या होत्या. आता यालाच उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी लिहिलेली पत्रं ट्विट केली आहेत. याच बरोबर शरद पवार आणि पी. व्ही नरसिंहराव यांची पत्र देखील ट्विट केली आहेत.
वीर सावरकर यांच्या पत्रातील ‘आय बेग टू रिमेन युवर रॉयल हायनेस ओबिडियन्ट सर्व्हंट’ या वाक्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली होती. तेच वाक्य असलेले महात्मा गांधी यांचे पत्र आज देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले. सोबतच राहुल गांधी यांच्या आजी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांबाबत लिहिलेले पत्र, ज्यात सावरकरांना स्वातंत्र्य आंदोलनातील एक भक्कम आधारस्तंभ आणि भारताचे एक संस्मरणीय पुत्र म्हणून उल्लेख केला आहे, तेही पत्र फडणवीस यांनी ट्विट केले. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत काय म्हटलंय ते देखील जरा वाचा... त्या म्हणतात सावरकर हे स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे. आधारस्तंभ आणि सदैव लक्षात राहणारे भारताचे सुपुत्र आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं विशेष स्थान असणारे शरद पवार यांचे वीर सावरकरांबाबत भाषण आणि त्यांच्याविषयी लिहिलेले पत्र, ज्यात दोन जन्मठेपेंचा उल्लेख आहे, तेही पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. वीर सावरकर यांची सामाजिक सुधारणांसाठी असलेली प्रतिबद्धता, युवा पिढीला प्रेरणा आदींबाबत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी दिलेला संदेश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज काही वृत्तपत्रांची जुनी कात्रणे सुद्धा ट्विट केली, ज्यात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रखर देशभक्त, असीम त्यागाचे प्रतीक आणि प्रत्येकाच्या हृदयात सन्मानाशिवाय दुसरी कोणती भावनाच असू शकत नाही, असे संबोधले आहे. एवढेच नाही तर हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी सावरकरांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांच्या विचारांवरच चालण्याची आवश्यकता याचीही गरज प्रतिपादीत केली आहे.
राहुल जी,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2022
कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियाँ पढ़ने को कहा था,
चलो, अब कुछ दस्तावेज़ आज मैं आपको पढ़ने देता हूँ।
हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा ?
क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे?#VeerSavarkar @RahulGandhi pic.twitter.com/hwtDtuB1ws
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, इंडियन नॅशनल चर्चचे फादर विल्यम्स, श्रीमती इंदिरा गांधी, तत्कालिन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सावरकरांबद्दल व्यक्त केलेल्या भावनांच्या संदर्भातील वृत्तपत्र कात्रणे सुद्धा त्यांनी ट्विट केली आहेत. राहुल गांधी हे वारंवार अशी विधाने करुन आपली व्होट बँक वाचवित असतील. पण, असेच सिलेक्टिव्ह वाचत राहिले, तर येणार्या अनेक पिढ्या त्यांना म्हणतील, अरे भाई कहना क्या चाहते हो, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी शेवटी उपस्थित केला आहे.