एक्स्प्लोर

Devendra Fadanvis On Sharad Pawar : शब्द पवारांचे, बोल फडणवीसांचे; ‘ती’ दहा वाक्ये वाचत उद्धव ठाकरेंवर सोडले टीकेचे बाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन जोरदार टोलेबाजी केली आहे. यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

Pune Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनाम्यावरुन जोरदार टोलेबाजी केली आहे. यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावरुन त्यांनी जोरदार टीका केली आहे, ते म्हणाले की, राज्यात टीआरपी कसा मिळवायचा याचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे.मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. त्यानंतर पक्ष राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. त्यावर ठराव करेल. त्यानंतर मीच माझा राजीनामा परत घेऊन आपल्या स्थानावर परत येईल, असा सगळा गोंधळ शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केला. राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं, यातील फरक काय आहे, हे शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं, असा टोलाही त्यांनी पवारांना लगावला.

मविआ सरकारवर टीका करताना ते म्हणाले की,  आम्ही भाकरी फिरवत नाही गरिबांच्या भाकरीची चिंता करतो. सध्या सगळीकडे भाकरी फिरवण्याची चर्चा आहे. त्यातील एक पक्ष भाकरी फिरवतात दुसरा भाकरीचे तुकडे करतात आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरी हिसकावून घेतो. फक्त भाजपच गरिबांच्या भाकरीची चिंता करते, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. 

'लोक माझे सांगाती' या पुस्तकावरुनदेखील त्यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधला आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात काय़ लिहिलं आहे,  हे देवेंद्र फडणवीसांनी भर बैठकीत वाचून दाखवले. आम्ही करत असलेले आरोप खरे असल्याचं ते म्हणाले. शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले. ठाकरे यांच्यावर आम्ही करत असलेले आरोप चुकीचे नव्हते, असेही फडणवीस यांनी म्हटले आणि 'लोक माझे सांगाती'मधील 10 वाक्ये वाचून दाखवली. 

 

'लोक माझे सांगाती' पुस्तकात काय लिहिलं आहे?

1. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरे यांंच्या संवादात नव्हती. 
2.  उद्धव ठाकरे यांना राज्यातील घडामोडींची माहिती नसायची जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी.
3. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यावर शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पना आम्हाला नव्हती. 
4. कधी, कुठे, काय घडेल याचा अंदाज घेण्याची क्षमता उद्धव ठाकरेंकडे नव्हती.
5.  घडामोडींनुसार कोणती पावलं उचलायची या राजकीय चातुर्यांची कमतरता जाणवत होती. 
6. राज्यात सगळं घडत होतं हे त्यांना टाळता आलं नाही आणि मविआ सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली होती. 
7. उद्धव ठाकरे ऑनलाईन प्रशासनाच्या संपर्कात होते मात्र अजित पवार आणि राजेश टोपे हे ग्राऊंडवर उतरुन काम करत होते. 
8. उद्धव ठाकरेंचं दोन वेळाच मंत्रालयात जाणं पचनी पडणारं नव्हतं.  

पवारांचे आभारी आहोत: फडणवीस

हे सगळं पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात लिहिले आहे आणि हेच सगळे आरोप आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना करत होतो. त्यामुळे पवारांनीच हे लिहिल्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो म्हणत फडणवीसांनी पवारांना आणि उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget