(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nawab Malik : नवाब मलिकांचे दाऊद इब्राहीम आणि अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार, यातील पैशातूनच मुंबईत बॉम्बस्फोट, देवेंद्र फडणीवीसांचा आरोप
Nawab Malik Arrest: नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता 3 मार्चपर्यंत त्यांना ईडी कस्टडी सुनावण्यात आली आहे.
Nawab Malik : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली नुकतीच त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कस्टडी सुनावण्यात आली आहे. यानंतर या सर्व प्रकरणाबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या असून विविध नेतेमंडळी आपआपली प्रतिक्रिया देत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर काही आरोप केले आहेत. 'मलिक यांनी अंडरवर्ल्डसोबत आर्थिक व्यवहार करत जमीन खरेदी केली आणि या व्यवहारातील पैसे मुंबईत बॉम्बस्फोट कऱण्यासाठी वापरण्यात आले.' असा आरोप करत ईडीच्या कारवाईचे समर्थन केले आहे.
फडणवीस म्हणाले, ''हा सर्व प्रकार म्हणजे टेरर फडींगचा असून अतिशय गंभीर प्रकार आहे. मलिक यांनी ही जमीन सरदार खान आणि पटेल यांच्याकडून खरेदी केले. हे लोक दाऊदची बहिण हसीना पारकरच्या जवळचे व्यक्ती असून त्यांच्याडून मलिकांनी ही संपत्ती खरेदी केली. या व्यवहारातून जे 55 लाख हसीना पारकरला मिळाले याचे पुरावे ही ईडीला मिळाले आहेत. तसंच हेच पैसे पुढे दाऊदपर्यंत कसे गेले याचे पुरावेही ईडीला मिळाले असून या जमीन व्यवहारानंतर मुंबईत तीन वेळा दहशतवादी हल्ले झाले आहेत. दरम्यान अशा हल्लेखोरांसोबत व्यवहार केलाच का? असा सवाल फडणवीसांनी विचारत ई़डीने केलेली कारवाई नियमातून केलेली आहे.''अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई वर हल्ले करणाऱ्यांसोवत व्यवहार का केले
मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना 3 मार्चपर्यंत म्हणजे नऊ दिवसांची ईडीची कस्टडी देण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. त्यानंतर या प्रकरणात सत्र न्यायालयात हा निर्णय दिला आहे. हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित आहे, मनी लॉंड्रिंगशी संबंधित आहे त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ईडीची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Nawab malik: नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी; सत्र न्यायालयाचा निर्णय
- Nawab Malik: नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम, मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा निर्णय
- Nawab Malik: नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी; जाणून घ्या दिवसभरात आज काय काय घडलं?