एक्स्प्लोर

West Bengal Violence: पश्चिम बंगालमधील हिंसाचार हा लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

ममता दीदींनी वेगवेगळ्या उपमा देणारे आता हिंसाचारावर काय बोलणार असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला लगावला आहे.पश्चिम बंगालमधील हिंसाचाराविरोधात राज्यभर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात येतंय. 

नागपूर: केवळ राजकारणासाठी देशात हत्या होणार असतील आणि देशातील राजकारणी त्यावर गप्प बसून त्याला मुकसंमती देणार असतील तर हे लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट आहे. पश्चिम बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांविरोधातील हिंसाचार हा लोकशाहीविरोधी असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. तसेच देशभरातील भाजपचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमधील कार्यकर्त्यांच्या सोबत असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या विरोधात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आंदोलन सुरु केलं आहे. 

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून भाजपकडून राज्यभर आंदोलन केलं जातंय. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्वत:ला पुरोगामी म्हणणारे पश्चिम बंगालमधील हिंसाचारावर गप्प का आहेत. केवळ राजकारणासाठी देशात हत्या होणार असतील आणि देशातील राजकारणी त्यावर गप्प बसून त्याला मुकसंमती देणार असतील तर हे लोकशाहीवरील सर्वात मोठं संकट आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत."

ममता दीदींना वेगवेगळ्या उपमा देणारे आता हिंसाचारावर काय बोलणार हा आमच्या समोर सवाल आहे असं सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांना टोला लगावला. 

सध्या कोरोनाचा काळ आहे अन्यथा आमची बंगालमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याची तयारी आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. सध्या बंगालमध्ये जो नरसंहार सुरू आहे तो थांबवणे आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करणं हीच आमची प्राथमिकता आहे असं त्यांनी सांगितलं. 

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली आहे की बंगालमधील ज्या कार्यकर्त्यांची घरे जाळण्यात आली आहेत त्यांना राज्य भाजपाच्या वतीने नवीन घरे बांधून देण्याची परवानगी द्यावी अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचार झाला असून तो हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घडवला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. 

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget