अजित पवारांनी अमोल मिटकरींना आवरावं, नाहीतर बारामतीसह इंदापूर मध्ये राष्ट्रवादीचे काम करणार नाही, भाजप युवा मोर्चाचा इशारा
अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार अमोल मिटकरींना (Amol Mitkari) आवरावे नाहीतर आम्ही इंदापूर (Indapur) आणि बारामतीमध्ये (Baramati) राष्ट्रवादीचे काम करणार नाही अशी भूमिका भाजप युवा मोर्चाने घेतलीय.
BJP Yuva Morcha on Amol Mitkari : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार अमोल मिटकरींना (Amol Mitkari) आवरावे नाहीतर आम्ही इंदापूर (Indapur) आणि बारामतीमध्ये (Baramati) राष्ट्रवादीचे काम करणार नाही अशी भूमिका भाजप युवा मोर्चाने (BJP Yuva Morcha) घेतली आहे. अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकर यांचे बारामतीतून डिपॉझिट जप्त झालं तसेच त्यांच्यावरती टीका केली होती. याच वक्तव्यावरुन आता भाजपा आक्रमक झाली आहे.
अजित पवारांनी अमोल मिटकरी यांना आवर घालावी अन्यथा आम्ही बारामती आणि इंदापूर विधानसभेत राष्ट्रवादीचे महायुती म्हणून काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याबाबात युवा मोर्चाचे वैभव सोलनकर यांनी इशारा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचं बारामतीतील आव्हान मोडीत काढलं होतं. भाजपने बारामतीतून (Baramati Assembly Election result) अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना उतरवलं होतं. मात्र, अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव केला. पडळकरांसह सर्वच उमेदवारांचं अगदी डिपॉझिट देखील जप्त केलं होतं. यावरुनच मिटकरींनी त्यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले...