बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले...
Amol Mitkari : शरद पवार आणि सुनेत्रा पवार बारामतीमधील कार्यक्रमात एकाच मंचावर आले होते. मात्र शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला दिसून आला. यावर अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे.
अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल बुधवारी वाजले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच बारामतीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) एकाच मंचावर दिसून आले. बारामतीमधील (Baramati) विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या अबोला दिसून आल्याची चर्चा आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी संतापले
शरद पवार आणि सुनेत्रा पवारांच्या बारामतीच्या कार्यक्रमातील अबोल्याच्या बातम्यांवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांनाच खडेबोल सुनावले आहेत. पवार साहेब आणि सुनेत्रा वहिनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना पाहून बोलणार का? असं सवाल त्यांनी उपस्थित केलाय. हा विषय पवार कुटुंबियांचा कौटुंबिक विषय असल्याचंही आमदार मिटकरी यांनी म्हटले आहे.
राजेंद्र शिंगणेंवर अमोल मिटकरींचा हल्लाबोल
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सोडून जाणाऱ्या डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांच्यावर अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देऊनही डॉ. शिंगणे यांनी अजित पवारांशी विश्वासघात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे अजित पवारांचे होऊ शकले नाही, ते शरद पवारांचे होतील का?, असा सवालही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय.
अजित पवार विक्रमी मतांनी निवडून येतील
दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघासाठी (Baramati Assembly Constituency) चर्चा सुरू असलेल्या युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही, असेही आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत. युगेंद्र पवारांची तेवढी राजकीय आणि वैचारिक उंची नसल्याचंही ते म्हणाले. बारामतीत यावेळी अजित पवार विक्रमी मतांनी निवडून येतील, असा आशावादही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या