एक्स्प्लोर

पोलिस अधिकाऱ्यांच्या महागड्या गाड्या पाहून अजित पवार अवाक्, म्हणाले...

Deputy Chief Minister Ajit Pawar : आपल्या बेधडक शैलीमुळं आणि स्पष्टवक्तेपणामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. आपल्या शैलीत कुणाचाही थेट समाचार घेत असतात. आता त्यांनी पोलिसांना मिळणाऱ्या महागड्या गाड्यांबाबत भाष्य केलं आहे.

पुणे : आपल्या बेधडक शैलीमुळं आणि स्पष्टवक्तेपणामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच चर्चेत असतात. आपल्या शैलीत कुणाचाही थेट समाचार घेत असतात. आता त्यांनी पोलिसांना मिळणाऱ्या महागड्या गाड्यांबाबत भाष्य केलं आहे. पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबईत असताना मला काही पोलिस अधिकारी भेटण्यास आले, त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या गाड्या पाहिल्या असता त्याची किंमत 35 लाख रुपये असल्याचे समजले. याबाबत चौकशी केली असता समजले की, उद्योगपतीने अशा महागड्या गाड्या पोलिसांना दिल्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्रमात सांगितले.

यावेळी अजित पवार म्हणाले की, सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कुणी कशी वाहने वापरावी याबाबत नियमावली आहे. पोलिस शासनाचे कर्मचारी असून उद्योगपतींनी दिलेल्या महागड्या गाड्या सरकारी नोकरी करताना वापरणे हे चुकीचे आहे. गृहमंत्री कोणते वाहने वापरतात आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी कोणत्या वाहनाने फिरतात याकडे जनतेचे लक्ष असते. पोलिसांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या घरांचे काम सरकार प्राधान्याने करत असून त्यासाठी निधीही देत आहे. जादा एफएसआय आणि चांगल्याप्रकारचे दर्जेदार घर देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

'अजितदादांची डोळ्यांची भाषा शिकणार, गॉगल घातला तरी...!' मुख्यमंत्री ठाकरेंची कोटी अन् हशा

सामान्य लोकांना पोलिसांचा आधार वाटला पाहिजे काल पुण्यात अजित पवारांचा अनुकंपा तत्वावरील भरतीचा कार्यक्रम झाला. यावेळी अजित पवार म्हणाले की, आपल्या हद्दीत गुन्हा होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी. आपापल्या हद्दीत रात्रगस्त वाढवावी. यावेळी गजानन मारणे प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणात संबंधित पोलिसांनी असं वागायला नको होतं. ते का घडलं याची कारणे शोधायला हवीत. त्यांच्या अशा वागण्याने संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा खराब होते. एखादा गुंड तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढतो. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. शहराच्या दृष्टीने असे होणे बरोबर नाही. पोलिसांनी याविषयी दक्षता घेणे गरजेचे आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असला पाहिजे. सामान्य लोकांना पोलिसांचा आधार वाटला पाहिजे. याची दक्षता पोलिसांनी घेणे गरजेचे आहे, असं देखील अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
Manoj Jarange: आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर जरांगेंचा संताप: म्हणाले 'जर तुम्ही रोखणार असाल तर...'
आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर जरांगेंचा संताप: म्हणाले 'जर तुम्ही रोखणार असाल तर...'
Manoj Jarange Mumbai Agitation: मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
मनोज जरांगेंच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना झटका, आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली
मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
पश्चिम बंगालमध्ये चक्क टीएमसीच्या फुटीर गटाची थेट ममता बॅनर्जींनाच ऑफर, राजकीय भूवया उंचावल्या!
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
Arvind Kejriwal: तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
तब्बल पाच महिन्यांनी अरविंद केजरीवालांनी भाजपवासी राघव चड्ढांवर मौन सोडलं! म्हणाले, 'आता कोणाला राज्यसभेवर पाठवण्यापूर्वी..'
Bank Holiday: बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?
बँका 'या' आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी? 
Embed widget