एक्स्प्लोर
Advertisement
आपली वाटचाल अराजकतेकडे, लोकशाही खरोखर धोक्यात : राज ठाकरे
आपली वाटचाल अराजकतेकडे सुरु असून लोकशाही खरोखर धोक्यात आली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
रत्नागिरी : सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेत किती हस्तक्षेप आहे, ते यातून समोर आलं, असं म्हणत लोकशाही खरोखर धोक्यात आली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
रत्नागिरीमध्ये राज ठाकरे बोलत होते. ''चार न्यायमूर्ती जे बोलले ते अत्यंत गंभीर आहे. लोकशाही आता खरोखर धोक्यात आली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगही सरकार चालवतंय हे समोर आलं होतं, आता न्यायव्यवस्थेतील वास्तव समोर आलं आहे. हा देश केवळ अडीच माणसं चालवत आहेत. आपली वाटचाल अराजकतेकडे सुरु असून हे सरकारच्या अंगाशी येईल'', असं राज ठाकरे म्हणाले.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींची पत्रकार परिषद
"सुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही", अशी हतबलता दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नाही तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.
विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरासमोर ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?
पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारं आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचं कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असं आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही.
संबंधित बातम्या :
सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता
सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?
सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील
न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement