एक्स्प्लोर

आषाढी वारीबाबतचा निर्णय कोरोनाची परिस्थिती पाहून 30 मे नंतर घेणार!

आषाढी वारीबाबतचा निर्णय 30 मे नंतर घेणार आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत राजकिय पक्षांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात कोरोनाची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन हा घेणार निर्णय घेणार असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सोलापूर : आषाढी वारीचे नियोजन करण्यासाठी आळंदी आणि देहु देवस्थानच्या विश्वस्तांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला राजकिय पक्षांचे प्रतिनिधी आणि सरकारी अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी मोजक्या लोकांसह आळंदी आणि देहु मधुन मोजक्या लोकांसह पायी पालखी सोहळा पार पाडला जावा. मात्र, त्याची रुपरेषा प्रशासनाकडून ठरवली जावी, असा सुर या बैठकीत उमटला. विश्वस्तांच्या या मागणीवर ठिकठिकाणच्या अधिकारी आणि पोलिसांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं शेतकऱ्यांच्या या प्रतिनिधींना सांगण्यात आलं आहे.

कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. त्यासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांच्यासोबत दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक पार पडली. राज्यातील हा सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाला कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. परंतु, वारकरी संप्रदायाने परंपरा खंडित न करण्याची भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. या बैठकीत 30 मे नंतर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असा निर्णय झाला आहे.

लॉकडाऊनमधील नियोजन, आर्थिक व्यवहार सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक, शरद पवारही उपस्थित

या यात्रेला सात संतांच्या प्रमुख मानाचे पालखी सोहळे हजारो भविकांसह पायी पंढरपूरला येत असतात. याशिवाय इतर 150 पालखी सोहळे राज्य आणि शेजारच्या राज्यातून पायी चालत येत असतात. सर्वात मोठे असलेले संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम पालखी सोहळे पुणे आणि पिंपरी चिंचवड या रेड झोनमधून येतात तर निवृत्तीनाथांची पालखी त्रिंबकेश्वर, सोपानदेव यांची सासवड, नाथ महारकांची पैठण तर मुक्ताईची मुक्ताईनगरमधून म्हणजेच रेड झोनमधून येते.

सोलापूर जिल्हाही रेड झोनमध्ये असून जवळपास 330 कोरोना रुग्ण येथे आहेत. अशावेळी आषाढी यात्रेला परवानगी दिल्यास कोरोना व्हायरसच्या फैलावाची भीती सध्या पंढरपूरकर नागरिक आणि प्रशासनाला भेडसावत आहे. आता परंपरा जपण्यासाठी राज्याला वेठीला धरणे योग्य नसल्याची भूमिका वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी मांडत आहेत. त्यामुळे आज अजित पवार यांना याबाबतच निर्णय घ्यायचा असल्याने आषाढीचे भवितव्य या बैठकीवर अवलंबून आहे.

Pandharpur Wari | पंढरीचा राजा यंदा भक्तांविनाच? यंदाची आषाढ वारी रद्द होणार का? स्पेशल रिपोर्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget