मुंबईतल्या पावसाची नेमकी स्थिती काय, कुठे आणि का पाणी तुंबलं? देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात A टू Z डेटा मांडला
Maharashtra News: आजच्या पावसानं झालेल्या मुंबईच्या तुंबईमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट माहिती दिली.
Maharashtra Rain Updates: मुंबई : मुंबई (Mumbai News) महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आज दुपारी 1.57 वाजता समुद्रात 4.40 मीटर उंच भरती आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे. आजच्या पावसानं झालेल्या मुंबईच्या तुंबईमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट माहिती दिली.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि हाईटाईड आहे, या दोन्ही एकत्रित येतात. मुंबई हा बेटाचा भाग आहे, त्यामुळे आपल्याला मुंबईचा समुद्रातच त्याचा निचरा आपण करतो. ज्यावेळेस येतो त्याला त्याचा निचरा होऊ शकत नाही, त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते. तशा प्रकारे आलेली नाही. पण जे काही फोरकास्ट दिलेला आहे. एक वाजून 27 मिनिटांनी सुरू होतोय आणि ऑरेंज अलर्ट पाऊस पडला किंवा मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतोय तर त्या ठिकाणी निश्चितपणे अडचणीची स्थिती येऊ शकते. आज मला वाटतं सरासरी देखील या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत, बरेचसे अधिकारी देखील पोहोचू शकलेल्या नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत."
"सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 216.5 मिलिमीटर पाऊस 24 तासांत पडला. जवळपास 374 जणांना तिथे सुरक्षित ठिकाणी आपण हलवलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये 95.6 मिलिमीटर पाऊस पडलाय, कुलाबा भागात 83.8 मिमी, तर सांताक्रुझमध्ये 267.9 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. मुंबई उपनगर सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. कुर्ला स्थानकावरचा रेल्वे ट्रॅक पाण्याखाली होता, आता त्यातलं पाणी बऱ्यापैकी काढण्यात आलेलं आहे. चुनाभट्टी येथे पाणी साचल्यामुळे हार्बर लाईन बंद आता ते पाणी काढण्याचं काम चाललेलं आहे. सेंट्रल लाईनवर रेल्वे वाहतूक सुरू आहे, आता ती बऱ्यापैकी सुरळीत सुरू असून पंधरा मिनिटात उशिरानं सुरू आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथ येथे थांबवण्यात आली होती."
"ठाण्याला देखील काही रेल्वे थांबवण्यात आल्या होत्या, अर्थात स्लो लोकल, फास्ट लोकल लाईन त्यानंतर साधारणपणे सकाळपर्यंत खूप मोठी हानी झालेली नाही. तथापि, काही प्रमाणात किरको प्रमाणात काही ठिकाणी हानी झाल्याचा आपल्या लक्षात येतंय आणि मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ठाणे या सगळ्या भागांमध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.", असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.