(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News: घडलेली घटना आपल्या सर्वांकरिता कमीपणा आणणारी, राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nagpur News : राजकोट किल्ल्यावर घडलेली घटना सर्वांकरिता कमीपणा आणणारी असून या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
Nagpur News नागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji maharaj) यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना आपल्या सर्वांकरता कमीपणा आणणारी आहे. ही घटना अतिशय दुःखद घटना आहे. पण त्याचवेळी अशा प्रकारची घटना झाल्यानंतर एक तर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. सोबतच तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे, या तिन्ही गोष्टींकडे सरकारकडून कारवाई सुरू आहे.
परिणामी, ही गोष्ट आम्ही गांभीर्याने घेतली असून दोषींच्या चौकशीसाठी समिती तयार करण्यात आली आहे. ही टीम त्या ठिकाणी जाऊन आली असून या संदर्भात योग्य ती चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. ते नागपूर (Nagpur News) विमानतळावर आले असता त्यांनी हे भाष्य केलं आहे.
ही घटना विरोधकांना केवळ राजकीय चष्मातून बघायची आहे- देवेंद्र फडणवीस
घडलेल्या घटनेकरता कुठली गोष्ट जबाबदार होती किंवा त्याच्यामध्ये काय चुका राहिल्यात, यासंदर्भातला रिपोर्ट त्या ठिकाणी असेल. किंबहुना पीडब्ल्यूडी विभागाने या पूर्वीच एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे. या रिपोर्टनंतर पोलीस विभाग देखील कारवाई करेल. तेव्हा सगळ्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होणार आहे. यासह मुख्यमंत्र्यांनी देखील या बाबत सांगितले आहे की, आपण नेव्हीला मदत करून त्यांच्या मदतीने त्या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा हा उभारणार आहोत. त्यामुळे या दृष्टीने ही घटना झाल्यानंतर जे जे करणे आवश्यक आहे, ते केलं जात आहे.
नौदलाकडून योग्य त्या उपाययोजना- देवेंद्र फडणवीस
नौदलाकडून देखील त्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जात आहे. मात्र त्याचवेळी केवळ याचं राजकारण करायचं, इतकंच काम विरोधकांसाठी उरले आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढायचं, प्रत्येक गोष्टीला इलेक्शनच्या चष्मातून बघायचा, निवडणुकांच्या चष्मनातन ही घटना पाहायची, हे अत्यंत चुकीचा आहे. अशा प्रकारचं खालच्या स्थराचे राजकारण त्यांनी करू नये, एवढेच त्यांना सांगतो. राज्य सरकार ने नौदल आणि संबंधित सगळ्यांना एकत्रित येऊन ज्या काही चुका घडलेल्या आहेत, त्या चुका त्या ठिकाणी पुन्हा घडणार नाहीत याच्या सूचनादिल्या आहेत. मात्र ज्यांनी चुका केल्यात त्यांना शासन होईलच आणि छत्रपती शिवरायांचा भव्य असा प पुतळा त्या ठिकाणी पुन्हा उभा राहील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केलाय.
हे ही वाचा