एक्स्प्लोर

Dawood Ibrahim : राज्य सरकारचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला दणका; रत्नागिरीतील जमिनीचा लिलाव होणार

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मालकीच्या जमिनींचा पुढील महिन्यात लिलाव करण्यात येणार आहे.

Dawood Ibrahim :  काही दिवसांपूर्वी मृत्यूच्या बातमीने चर्चेत आलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला राज्य सरकार आणखी एक दणका देणार आहे. रत्नागिरीतील मुंबके येथील दाऊदच्या मालकीची जमीन आहे. त्याचा लिलाव करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात 5 जानेवारी 2024 रोजी जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. 

भारतातून फरार असलेला आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी दाऊद इब्राहिम कासकर हा मूळचा कोकणातील आहे. रत्नागिरीतील मुंबके हे दाऊदचे मूळ गाव आहे. दाऊदने तस्करी, खंडणी आणि इतर बेकायदेशीरमार्गाने अमाप संपत्ती जमवली. त्यातून त्याने काही मुंबईसह विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या होत्या. आता दाऊदच्या याच मालकीच्या जागांचा लिलाव करण्यात येणार आहे. 

रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या  चार जागांचा लिलाव होणार आहे. यामध्ये चार शेत जमिनींचा समावेश आहे. जवळपास 20 गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही 8 लाख 8 हजार 770 रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत 21 नोव्हेंबर 2023 रोजी लिलावाबाबत नोटीस काढण्यात आली होती. 
 
दाऊद इब्राहिम कासकरचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या. 

या आधीदेखील मालमत्तेचा लिलाव

तीन वर्षांपूर्वीदेखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.  स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून हा लिलाव जिंकला होता.  स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अॅक्ट (SAFEMA) अंतर्गत हा ऑनलाइन लिलाव झाला होता. काते  यांनी 1 कोटी 10 लाख रुपयांना मालमत्ता लिलावात घेतली. या जागेची किंमत ६१ लाख ४८ हजार १०० रुपये निश्चित करण्यात आली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींनाPM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget