Pankaja Munde : जिथं तुमचं भलं तिथचं नतमस्तक, माझी माणसं संयम दाखवणार नाहीत; पंकजा मुंडे कडाडल्या
जिंकण्यासाठी निष्ठा आणि नितीमत्ता गहान ठेवली जाऊ शकत नाही असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. माझं सर्वस्व हे तुम्ही असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
Pankaja Munde Dasara Melava: जिंकण्यासाठी निष्ठा आणि नितीमत्ता गहान ठेवली जाऊ शकत नाही असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं. माझं सर्वस्व हे तुम्ही आहेत. माझी निष्ठा ही तुमच्यावर आहे. जिथं तुमचं भलं तिथचं पंकजा मुंडे नतमस्तक होणार आहे. पाच वर्षात मी खूप काम केल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे या दसऱ्यानिमित्त आयोजीत केलेल्या मेळाव्यात बोलत होत्या.
आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर ऊन्हात बांधू
नितीमत्ता बाजूला ठेऊन राजकारण करणं देशाच्या हिताचे नाही असे आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितले. जिंकण्यासाठी निष्ठा गहान ठेवली जाऊ शकत नाही असे पंकजा मुंडे म्हणाल्या. आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर ऊन्हात बांधू, आता माझी माणसे संयम दाखवणार नाहीत. माझी माणसे आता शिवाचे रुप दाखवणार आहेत.
आता मुंडे साहेबांचे स्मारक करु नका
मी तुमची सेवक आहे. तुम्हाला हवे असे राजकारण करणार आहे. मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतरही मुंडे साहेब गावागावात आहेत. मुंडे साहेबांना जाऊन दहा वर्ष झालं तरी मुंडे साहेबांचे स्मारक सरकारनं केले नाही. आता मुंडे साहेबांचे स्मारक करु नका असे पंकजा मुंडे म्हणाल्या. आता करायचेच असेल तर महिलांना सन्मान द्या.आता काही बनवायचेच असेल शेतकऱ्यांना आत्महत्येपासून दूर करणारे काही करा, धर्माच्या आणि जातीच्या भींती पाडा, ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण द्या, आरोग्य द्या हेच गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक असल्याचे पंकजा मुंडे म्हणाले.
मैदानात उतरणार, आता मी पाडणार
आता तुमच्यासाठी मैदानात उतरणार आहे. आता मी पाडणार आहे. पैशाच्या जोरावर राजकारण करत आहेत त्याला पाडणार आहे. जो शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करणार नाही त्याला पाडणार आहे. जो महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करुन देण्यात अडसर असेल त्याला पाडणार आहे. तरुणांना बरोजगारीत टाकणाऱ्यांना पाडणार आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. चारीत्र्यसंपन्न नेतृत्व घडवण्यासाठी काम करणार आहे. राज्याला स्थिरता हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला कोठे बसवायचे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता फक्त मेरीट राहणार आहे. मला काही मिळो न मिळो पण तुमच्यासाठी रात्रं दिवस लढणार असल्याचे पंकडा मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या: