एक्स्प्लोर
Pankaja Munde Speech : जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही, पंकजा मुंडे कडाडल्या; दसरा मेळाव्याच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Pankaja Munde Dasara Melava 2023 : पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये दसरा मेळाव्याला संबोधित केलं. त्यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा.
Pankaja Munde in Beed Dussehra Meleva : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी विजयादशमी (Vijayadashami) च्या शुभमुहूर्तावर बीड (Beed) मधील सावरगाव (Sawargaon) येथे आयोजित दसरा मेळाव्यात (Dasara Melava 2023) जनसमुदायाला संबोधित केलं. जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा देत आणि 'भगवान बाबा की जय' अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली.
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
- छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये माझं सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वागत केलं. मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या, माळी लोकांनी माझं स्वागत केलं. या दसऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी गर्दीचं सीमोल्लंघन केलं. यासाठी सर्वांचे आभार. मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा केली, तेव्हा मला वाटलं नव्हतं मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एवढं प्रेम मिळेल. शिवशक्ती परिक्रमा भव्य करण्याचं काम माझ्यावर आणि मुंढे साहेबांवर प्रेम करणाऱ्या जनतेनं केलं आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले तरी, तुमचे हे उपकार मला फेडता येणार नाहीत.
- माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली त्यावेळी तुम्ही दोन दिवसात 11 कोटी तुम्ही जमा केले. तुम्ही उन्हात बसलात, म्हणून स्टेजवरचे सुद्धा उन्हात आणि मी सुद्ध उन्हात आहे.
- मी लोकांचे पैसे घेतले नाही, माझ्या लोकांचे आर्शिवाद पुरेसे आहेत. तुम्ही जमा केलेले पैसे मी घेणार नाही, असे मी मझ्या मुलाला सांगितलं. मी तुम्हाला फक्त स्वाभिमान देऊ शकते. माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीत जाऊन बसणाऱ्यांचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही.
- जिंकण्यासाठी तुम्ही निष्ठा गहाण ठेवू शकत नाही. राजकारणात माझ्या लोकांचे हित बघणे माझे परम कर्तव्य आहे. जनतेला न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसरा मेळाव्याला तोंड दाखवणार नाही.
- माझ्या आयुष्यात मी निवडणूक हरली असले तरी तुमची मान खाली जाईल असे काम मी करणार नाही.
- भाषणादरम्यान वायर कापल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. कोण दाबणार माझा आवाज? माझा आवाज कुणीही दाबू शकणार नाही. मी सर्वांसाठी काम केलं. कधी जात पाहीलं नाही, धर्म पाळला नाही, फक्त पाहिलं ते तुमच्या अंगातील रक्त.
- आज महाराष्ट्रात गंभीर प्रश्न मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित होत असताना या सरकारकडून आणि नेत्यांकडून समाजाची खूप अपेक्षा आहे, या अपेक्षा भंग होणं आता जनतेला सहन होणार नाही.
- काम करताना निवडणुकीत मी पडले. राजकारणात माझा पाय मोडला तर, मला कुबड्या घेऊन चालावं लागतं. मला माझ्या लोकांनी कुबड्या दिल्या आणि मी मॅरेथॉन धावण्यासाठी तयार झाले.
- ज्यांना पद, प्रतिष्ठा आणि मान मिळतो त्यांचं भागतं. दरवेळी तुम्ही आशा लावता आणि दरवेळी तुमचा अपेक्षा भंग होतो. पद न घेता निष्ठा काय असते, या लोकांना विचारा. जिंकण्यासाठी निष्ठा, नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. आता माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही. आपल्याला त्रास देणाऱ्यांचं घर उन्हात बांधू. ज्या ठिकाणी तुमचं भलं त्याचं ठिकाणी पंकजा नतमस्तक होणार.
- गोपीनाथ गड तीन महिन्यातस बनवलं पण, आता तीन वर्ष झाली तरी, सरकारकडून मुंडे साहेबांचं स्मारक बनलेलं नाही. आता बनवूही नका. आता तर काही बनवायचं असेल तर, शेतकऱ्याचे कष्ट दूर करणारी जादूची काडी बनवा. माझ्या ऊस तोड कामगाराच्या कामाचं काहीतरी करा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement