एक्स्प्लोर

Pankaja Munde : मी कधीही कोणासमोर झुकणार नाही, आता 2024 च्या तयारीला लागा, पंकजा मुंडेंचा एल्गार

छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख असल्याचे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. सावरगाव येथील दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.

Pankaja Munde Dasara Melava 2022 : मी संघर्षाला घाबरत नाही. छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि भगवानबाबांची सात्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख असल्याचे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं. मी थकणार नाही, थांबणार नाही आणि कधीही कोणासमोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या. छत्रपती संभाजीराजेंचा आदर्श माझ्यासमोर आहे. त्यामुळं मी संघर्ष करत राहणार असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता कोणताही अपेक्षा करणार नाही. मी आता 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. भगवान भक्तीगड सावरगाव इथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात (Dasara Melava) पंकजा मुंडे बोलत होत्या. 

कोणी समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही

माझे लोक म्हणजे समुद्र आहे. समुद्राला बांधणे शक्य नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. जर कोणी समाजात भिंती उभ्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला क्षमा करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. लोकांना प्रेम नाही दिलं तर खुर्च्या रिकाम्या राहतील. आता माझ्याकडे कोणतेही पद नाही. देवेंद्र फडणवीसांनी 2019 मध्ये महाजनादेश यात्रा काढली होती, त्यावेळी सभा घेण्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरले. आता हे लोक माझी ताकद वाढवण्यासाठी आले आहेत. ज्या मुशीतून आमचे नेते आले त्याच मुशीतून मी आले आहे. आमच्यात व्यक्ती श्रेष्ठ नाही तर संघटन हेच श्रेष्ठ असल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. 

आता आमदारांची यादी आली तर माझं नाव घेऊ नका

आता आमदारांची यादी आली तर माझं नाव घेऊ नका, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी कोणावरही नाराज नाही. मी का नाराज होऊ, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या. मोठ्या मोठ्या लोकांना राजकारणात संघर्ष आला आहे. योग्य वेळेची वाट बघा असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी आता 2024 च्या तयारीला लागली आहे. मला कोणताही गर्व नाही, मी स्वाभिमानी आहे. मी तुम्हाला असत्य कधीही बोलणार नाही. सत्य कधीही पराजित होत नाही असेही त्या म्हणाल्या. 

मी कधीही कोणासमोर काही मागायला जाणार नाही

आता मी 2024 ला पक्षाने तिकीट दिलं तर तयारीला लागणार आहे. मला कोणत्याही नेत्याबद्दल काही बोलायचे नाही. आम्ही कमळाशिवाय दुसऱ्या बटणाला कधीही स्पर्श केला नाही, हे सांगताना पंकजा भावनिक झाल्याचे पाहायला मिळालं. मी कधीही कोणासमोर काही मागायला जाणार नाही. मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, आणि घेतला वसा टाकणार नाही. मी तुमच्यासोबत काम करणार आहे. आपण आपलं काम करणार आहोत, आता पदाची अपेक्षा करु नका असेही मुंडे यावेळी म्हणाल्या. 

महत्त्वाच्या बातम्या:

Pankaja Munde : PM मोदीविरोधातील कथित वक्तव्यावर पंकजा मुंडे स्पष्टच म्हटल्या, ज्यांचा वारसा....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget