एक्स्प्लोर

दाभोळकर - पानसरे हत्याप्रकरणात समान दुवा सापडल्याचा तपासयंत्रणेचा दावा

मात्र पानसरे हत्याप्रकरणांत मुख्य सुत्रधार तर दूरच पण अजून मारेकऱ्यांचाही शोध न लागल्याबद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली. तसेच धर्मनिरपेक्ष आणि समानतेच्या घोषणा करणाऱ्या सरकारनं आणि राजकीय पुढाऱ्यांनी तपासयंत्रणेच्या कामात ढवळाढवळ करू नये असे निर्देश दिले आहेत.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येत समान दुवा सापडला असून त्यादृष्टीनं येत्या 14 दिवसांत एक मोठं ऑपरेशन करण्यात येणार आहे. अशी माहिती सरकारी वकिलांनी शुक्रवारी हायकोर्टात दिली. तसेच डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात नव्यानं अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी खाडीत फेकलेलं हत्यार शोधून काढण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडून परवानग्या मिळाल्या असून लवकरच या कामाला सुरूवात होईल असं सीबीआयकडून कोर्टाला सांगण्यात आलंय. मात्र पानसरे हत्याप्रकरणांत मुख्य सुत्रधार तर दूरच पण अजून मारेकऱ्यांचाही शोध न लागल्याबद्दल कोर्टानं नाराजी व्यक्त केली. तसेच धर्मनिरपेक्ष आणि समानतेच्या घोषणा करणाऱ्या सरकारनं आणि राजकीय पुढाऱ्यांनी तपासयंत्रणेच्या कामात ढवळाढवळ करू नये असे निर्देश दिले आहेत.
तसेच गेल्या सुनावणीत हायकोर्टानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या निर्देशांमुळे गृह आणि अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांनी याबाबत बैठक घेतली आहे. जेणेकरून या दोन्ही तपासांत सीबीआय आणि एसआयटीला सर्वतोपरी सहाय्याची तयारी करता येईल. यासंदर्भातील सुनावणी हायकोर्टानं चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे.
कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 साली कॉम्रेड गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती तर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचाही अज्ञात मारेकऱ्यांनी ऑगस्ट 2013 साली हत्या केला होता. या प्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.
संबंधित बातम्या

दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी सुरू असलेल्या संथ तपासाबद्दल हायकोर्टाची नाराजी  

दाभोलकर-पानसरे हत्याप्रकरणांचा तपास नक्की कधी संपवणार? : हायकोर्टाची नाराजी

हायकोर्टाने दाभोलकर, पानसरे कुटुंबीयांना सुनावलं

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची धडक कारवाई, कोट्यवधी रुपयांचा अन्नसाठा जप्त, ठाण्यात 10 जणांना अटक
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले

व्हिडीओ

NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
दिवाळीसाठी सुस्साट... मुंबईत मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ; 46 अतिरिक्त फेऱ्या; प्रतीक्षा कालावधीही घटणार
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Embed widget